आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

7 ते 70 हजार किमतीचे नवे ब्ल्यूटूथ स्पीकर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संगीत सुस्पष्ट ऐकू येण्यासोबतच आकर्षक दिसणारे ब्ल्यूटूथ स्पीकर्स बाजारात उतरवले गेले आहेत. त्यांच्या डिझाइन्स व दिसण्यावर विशेष लक्ष देण्यात आले आहे. यांचे डिझाइन्स पाहणार्‍यांची त्यावरून नजर हटणार नाही.

स्पीकर्समध्ये तीन ड्रायव्हर्स
किंमत : ५12,995

याचे स्लीक इंटेरिअर पाहता हे लॉजिटेक ब्रँडचे प्रॉडक्ट आहे यावर विश्वास बसत नाही. इनबिल्ट ब्ल्यूटूथ असणारे हे या ब्रँडचे हे पहिलेच स्पीकर आहे. तीन डिव्हायसेसमधून म्युझिक स्ट्रीम करून उत्तम आऊटपुट देण्याची क्षमता. तीन ड्रायव्हरमधून सुस्पष्ट संगीत ऐकू येते. वरती असलेल्या टच सेन्सिटिव्ह सरफेसमुळे आवाजावर नियंत्रण ठेवता येते. यात बॅटरीची कोणतीही सुविधा नाही.

किंमत : ५ 6,999१फिलिप्स बीआर-1 एक्स
स्पीकरचा आकार विटेप्रमाणे आणि तिरप्या बाजूने पाहिल्यास टाइमबॉम्बप्रमाणे दिसेल. त्याचे वजन कमी, मात्र आकार मोठा आहे. प्लेबॅक क्षमता 6 तासांची आहे. हँड्स फ्री स्पीकरप्रमाणे वापरण्यासाठी यात बिल्ट-इन माइक आहे. स्पष्ट आवाजासाठी व्हॉल्यूम वाढवावा लागतो. मोठ्या आवाजात संगीत ऐकण्याची आवड असलेल्यांसाठी ही योग्य निवड ठरेल. चार्जिंगसाठी यात यूएसबी आहे.

प्लास्टिकने कंट्रोल डिस्कचा लूक बिघडला
किंमत : ५12,000

हाय एंंड ऑडिओ इंडस्ट्रीमध्ये सायरस हे नाव प्रसिद्ध आहे. हे कॉम्पॅक्ट ब्ल्यूटूथ स्पीकर आहे. याची अंतर्गत बनावट चांगली आहे. मात्र प्लास्टिकची कंट्रोल डिस्क हलक्या दर्जाची आहे. पूर्ण चार्जिंग झाल्यावर 10 तासांपर्यंत सतत संगीत ऐकू शकता. याच्या स्पीकरफोन्समुळे छोट्या व मध्यम रूम्समध्येही संगीताचा मिळतो.

विविध रंगांत, आकर्षक बनावटीसह
किंमत : ५ 70,000

स्पीकर्सची बनावट अ‍ॅल्युमिनियमने केली आहे. त्यामुळे यात मजबुती आली आहे. वरच्या बाजूने चकाकणारा मेटल टच आहे. त्यामुळे स्पर्शात फिनिशींगचा प्रत्यय येतो. क्युबिक एक्स्ट्रा पॅकेजमध्ये यात स्टिरिओसह एक स्पीकर जोडता येतो. त्यामुळे संगीत जास्त परिणामकारक करता येते. दिसायलाही हे आकर्षक आहे.

झिंक पेपरवर छायाचित्रे
- पोलारोइड सोशलमेटिक

पइस डिजिटल कर्व्हमध्ये अँड्रॉइड, वाय-फाय, 14 एमपी मेन सेन्सर आणि 2 एमपी रिअर स्नॅपर आहे. यात हीट-अ‍ॅक्टिव्हेटेड झिंक पेपर वर छायाचित्रांची प्रिंट घेता येते.