आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BMW Car News In Marathi, Automobile Industry, Divya Marathi

Auto: बीएमडब्ल्यूची 3- सिरीज जीटी अधिक ऐसपैस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीएमडब्ल्यूने नुकतीच 3 सिरीज लाँच केली. जीटी रेग्युलर 3 सिरीजपेक्षा ही जास्त सोयीसुविधायुक्त असून आरामदायक व प्रशस्त आहे. या कारची रचना पूर्वीच्या 3- सिरीजच्या धर्तीवरच आहे; परंतु आतील रचना फार ऐसपैस आहे. या नव्या मॉडेलची लांबी-रुंदी पाहता याला 5 सिरीजच नाव द्यायला हवे. लक्झरी कारच्या भारतीय ग्राहकांना हा चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे.


रुंद व्हीलबेस, उंच छत
बीएमडब्ल्यूने व्हीलबेस रुंद केले आहे. छत पूर्वीच्या तुलनेत उंच ठेवले आहे. मागच्या बाजूने त्याला जास्त उंची दिल्याने कारमध्ये जास्त जागा निर्माण करण्यात आली आहे. मागे लेगरूमची स्पेस वाढली आहे.

मागच्या सीट्सची वैशिष्ट्ये
मागच्या सीटवर जास्त उंच व्यक्ती आरामात बसू शकते. मागच्या सीटवर जाण्यासाठी दरवाजे रुंद करण्यात आले आहेत. सीटबेस उंच केल्याने जास्त वाकायची गरज नाही. सीट सपोर्ट चांगला आहे. आपल्या सोयीनुसार मागे रेलून आरामात बसता येते. मोठ्या सेंट्रल ट्युनलमुळेमध्ये बसणा-या व्यक्तीला त्रास होतो; पण ही कार 5 सिरीज इतकी मोठी नाही. मागची आसनव्यवस्था 5 सिरीज इतकीच किंवा त्यापेक्षाही चांगली आहे. छत उंच असल्याने केबिन अधिक हवेशीर झाले आहे.

डॅश रेग्युलर 3 सिरीज प्रमाणेच
समोरच्या चांगली स्पेस देण्यात आली आहे. व्हर्टिकल स्पेसने लेगरूमला अधिक आरामदायी बनवले आहे; परंतु यात डॅश रेग्युलर 3 सिरीज सारखाच असल्याने फरक जाणवत नाही.

समोरून दिसायला आकर्षक नाही
कंपनीने जरी 3 सिरीज जीटी नाव दिले असले, तरी अधिकांश बनावट 3 सिरीजप्रमाणेच दिसते. याचा दर्शनी भाग अधिक लांब आहे. केबिनच्या वर रूफलाइन रुंद व बल्ब आर्कप्रमाणे दिसते. समोरून दिसायला हे फारसे आकर्षक वाटत नाही.

500 लिटरपेक्षा जास्त बूट
सामानासाठी चांगली जागा देण्यात आली आहे. यात 500 लिटरपेक्षा अधिक बूट आहे. शिवाय मागच्या बाजूने स्कोडा सुपर्बप्रमाणे लिफ्ट-बॅक / हॅचसुद्धा आहे. त्यामुळे सामानाची चढ-उतार करणे सोयीचे झाले आहे.

ड्राइव्ह करण्यासाठी
प्रतिस्पर्धी कारच्या तुलनेत 3 सिरीज चालवणे आरामदायक अनुभव आहे. स्टिअरिंग हाताळण्यासाठी चांगले आहे. तीव्र वळणासाठीही जास्त क्लिष्ट नाही. ब्रेक्स जबरदस्त आणि पॅडल फील चांगला आहे. कारचा मागचा भाग लॉक्ड-डाऊन वाटत नाही. रेग्युलर 3 सिरीजप्रमाणेच सुरक्षित वाटते. अतिरिक्त वजन, अधिक ग्राउंड क्लिअरंस व जास्त लांबीचे व्हीलबेस असल्याने ड्राइव्हचा अनुभव स्फूर्तिदायक वाटतो. सस्पेंशन आरामदायक आहे. प्रवाशांना फक्त अतिखड्डे असतील तरच त्रास होतो. कारचे भारतातील मॉडेल्स जास्त ग्राउंड क्लिअरन्स व लांब स्प्रिंग्ज असलेले आहेत.

भारतात प्रथम 320 डी येणार
बीएमडब्ल्यू भारतात प्रथम जीटी 320 डी लाँच करणार आहे. त्यानंतर 328 आय लाँच होणार आहे. टर्बो चार्ज्ड डायरेक्ट-इंजेक्शन मोटारच्या अतिरिक्त टॉर्कने जीटीचे अतिरिक्त वजन हाताळणे शक्य झाले आहे.