आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बीएमडब्ल्यू आय-3 इलेक्ट्रिक कारबाबत एवढा गहजब का ?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीएमडब्ल्यूने नुकतेच न्यूयॉर्क, लंडन आणि बीजिंग या दाट लोकसंख्येच्या शहरात एकाच वेळी आय-3 ही इलेक्ट्रिक कॉम्पॅक्ट कार सादर केली. आगामी काही वर्षात जगातील प्रमुख शहरात एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जाण्यासाठी छोट्या व वजनाने हलक्या इलेक्ट्रिक कार रस्त्यावरून धावताना दिसतील, असा बीएमडब्ल्यू अधिकार्‍यांचा दावा आहे. हा दावा खरा मानला तर बीएमडब्ल्यूने त्यादिशेने एक पाऊल टाकले आहे.

आय-3 च्या सादरीकरणासाठी बीएमडब्ल्यूने 162 अब्ज रुपयांची गुंतवणूक केली आहे. त्यादृष्टीने बीएमडब्ल्यूसह इतर लक्झरी कार इलेक्ट्रिक कार निर्मात्यांसाठी हे सादरीकरण मैलाचा दगड मानला जात आहे. बीएमडब्ल्यूच्या आय श्रेणीतील भलेही ही पहिली इलेक्ट्रिक कार असेल, मात्र पाच दरवाजांची ही पहिली इलेक्ट्रिक कार नाही. या आधी निस्सान लीफ, शेव्हरले व्होल्ट आणि इतरही अशा प्रकारच्या कार आल्या आहेत. तेव्हा या नव्या कारवर इतका गहजब का ?

ही कार म्हणजे काही औद्योगिक क्रांती नव्हे. मात्र, या कारचे काही भाग या कारला विशेष बनवतात. बीएमडब्ल्यूच्या मते, आय-3 ची 160 किलोमीटरच्या श्रेणीतील कार शहरी तसेच निमशहरी भागात चालवण्यासाठी योग्य पर्याय आहे. विशेष ठिकाणी असलेल्या स्थानकांवर ही कार एक तासाहून कमी काळात चार्ज होऊ शकते, तर घरातील वॉल सॉकेटद्वारे चार्ज होण्यासाठी आय-3 ला आठ तास लागतात. बॅटरी डिस्चार्ज होत असेल तर पेट्रोल किंवा डिझेलचा पर्याय या कारला अधिक शक्तिशाली बनवतो आणि 300 किलोमीटर अंतर पार करण्यास मदत करतो.

गेल्या पाच वर्षांत इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत वाढ झाली आहे. गेल्या वर्षभरात जगभरात अशा प्रकारच्या 93 हजार कारची नोंदणी झाली आहे. यंदा दीड लाख अशा कारची विक्री होण्याची शक्यता आहे. असे असले तरी निस्सान, टोयोटा, जनरल मोटर्स आणि ऑडी यासारख्या दिग्गज कंपन्यांनी इलेक्ट्रिक कार निर्मिती थोडी बाजूला ठेवली आहे. तसेच या इलेक्ट्रिक कारच्या किमतीत कंपन्यांना कपात करावी लागली आहे. याच्या स्पेशालिस्ट मेकर्सनाही मागणीतील घटीचा सामना करावा लागत आहे. फिस्कर ऑटोमोटिव्ह इंक आणि कोडा ऑटोमोटिव्हने चाजिर्ंग नेटवर्क असणार्‍या बॅटर प्लेस या कंपनीसह दिवाळखोरीसाठी अर्ज दिला आहे.

इतर कंपन्यांच्या दाव्यानुसार आय-3 हे खरोखरच एक धाडसी पाऊल आहे का? इलेक्ट्रिक कारच्या क्षेत्रातील हे महत्त्वाचे पाऊल आहे का? मात्र आगामी कालातील कारबाबत बीएमडब्ल्यूला आणखी बरेच काम करायचे आहे.

पहिली गोष्ट अशी की निस्सान लीफ आणि शेव्हरले व्होल्टसह सर्व कार घरातील सॉकेटद्वारेच चार्ज कराव्या लागतात, हे आपण पाहिलेच आहे. चाजिर्ंगवरून अनेक देशात वेगवेगळ्या समस्या आहेत. अमेरिका आणि चीनमध्ये बहुतांश वीज जीवाश्म इंधनाद्वारे बनते. तेथे क्लीन झीरो इमिशन वाल्या कारचा सिद्धांतच खोटा ठरतो, तर भारतासारख्या इतर अनेक देशांत विजेची कमतरता मोठय़ा प्रमाणात आहे. अशा स्थितीत घरातील सॉकेटवर चार्ज होणारी कार पायाभूत संरचनेवर जास्तीचा बोजा ठरते.

झीरो इमिशनसह स्वत: वीज उत्पन्न करणारी कार आगामी काळासाठी योग्य इलेक्ट्रिक कार ठरणार आहे. यासाठी कोणत्याही जीवाश्म इंधनाचा वापर व्हायला नको. आय-3 अत्यंत सुंदरपणे बनवण्यात आली आहे. भविष्याच्या दृष्टीने ही कार शानदार दिसत असली तरी वास्तवात ती तशी नाही..

लेखक ब्रिटनस्थित ऑटोमोटिव्ह क्षेत्रातील पत्रकार आहेत.
kabeer.mahajan@dainikbhaskargroup.com