आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘बीएमडब्ल्यू एक्स 5’ आलिशान एसयूव्ही, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या हस्ते अनावरण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे,मुंबई - आलिशान मोटारींच्या मांदियाळीत बीएमडब्ल्यू या आघाडीच्या कंपनीने आता ‘बीएमडब्ल्यू एक्स 5’ ही तिसर्‍या पिढीतील एसयूव्ही बाजारात दाखल केली आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या हस्ते पुण्यामध्ये या नव्या कारचे अनावरण करण्यात आले.
> नव्या बीएमडब्ल्यू एक्स 25 एसयूव्हीचे उत्पादन चेन्नई येथील प्रकल्पात करण्यात येणार असून यंदाच्या जून महिन्यात ती देशभरातील वितरण केंद्रांत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
> बीएमडब्ल्यू एक्स 5 ही ‘स्पोर्ट्स अ‍ॅक्टिव्हिटी’ श्रेणीतील असून या श्रेणीतील सर्वाधिक विक्री होणारी कार आहे. आकर्षक अंतर्गत सजावटीसह अधिक ऐसपैस जागा, आकर्षक रचना, अभिनव उपकरणांमुळे नवीन बीएमडब्ल्यू ग्राहकांचे लक्ष वेधून घेईल, असा विश्वास बीएमडब्ल्यू समूहाचे अध्यक्ष फिलिप वॉन जार यांनी या वेळी व्यक्त केला.
गाणी ऐकत कार चालवणे आवडते
मी ही गाडी 2012 मध्ये म्युनिकमध्ये चालवली होती. भारतात मी 2002 पासून हा ब्रँड वापरत आहे. मुलांना शाळेत सोडायला, अंजलीला फिरायला वा शॉपिंगला मी याच गाडीतून जातो. गाणी ऐकत गाडी चालवणे मला आवडते.’’ सचिन तेंडुलकर

पुढील स्लाइडमध्ये जाणून घ्या, काय आहे किंमत