जर्मन लक्झरी कार निर्माता कंपनी 'बीएमडब्ल्यू' एसयूव्ही मॉडेल 'एक्स5'चे डिझेल व्हर्जन दिल्लीतील एका इव्हेटमध्ये लॉन्च केले. या लक्झरीयस कारची दिल्लीमधील एक्सशो रूम किंमत 70.9 लाख रुपये आहे.
बीएमडब्लूच्या चेन्नई येथील प्रकल्पात या कारची बांधणी करण्यात आली आहे. कंपनीचेएमडी रॉबर्ट फ्रिट्रॅंग म्हणाले, 'एक्स 5'ला मागणी मोठी असल्याने याचा वेटिंग पीरियड तीन महिन्यांचा ठेवण्यात आला आहे.
बीएमडब्ल्यूने 'एक्स 5'चे डिझेल मॉडेल पहिल्यांना 'दिल्ली ऑटो एक्स्पो 2014' मध्ये सादर केले होते. बीएमडब्ल्यूच्या 'एक्स5' मॉडेलला भारतीय एसयूव्ही कार मार्केटमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.