आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Boeing Black Is A Highly Secure And Modular Android Smartphone

बोइंगचे उड्डाण, सर्वात सुरक्षित स्मार्टफोन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिकागो - अमेरिकी कंपनी बोइंग ही पॅसेंजर विमाने व फायटर जेटच्या निर्मितीसाठी चांगलीच प्रसिद्ध आहे. मात्र, बुधवारी बोइंगने जगातील सर्वात सुरक्षित ‘ब्लॅक’ हा स्मार्टफोन सादर करत सर्वांना आश्चर्यचकित केले. हा फोन खासकरून अमेरिकी सुरक्षा संस्थांसाठी तयार करण्यात आला आहे. ‘ब्लॅक’ स्मार्टफोन हॅक होणार नाहीच, पण त्याची हेरगिरीही करता येणार नाही. कंपनीने या फोनची किंमत व वैशिष्ट्यांबाबत तपशीलवर माहिती दिलेली नाही.

सुरक्षित अँड्रॉइड ओएस व क्रिप्टो इंजिन
फोनमध्ये अँड्रॉइड ओएस एन्क्रिप्टेड आहे. इंटरनेटशी कनेक्ट झाल्यानंतर ओएस सर्व्हरशी कनेक्ट होणार नाही. क्रिप्टो इंजिन कॉल्स व डाटाला डिजिटल कोडमध्ये रुपांतरित करेल. त्याला ट्रेस व टॅप करता येणार नाही.

बायोमेट्रिक सेन्सर
युजर वगळता इतर कुणीही या फोनचा वापर करू शकणार नाही. नोंदणी झालेल्या वापरकर्त्याच्या बोटांचे ठसे किंवा तोंडी कमांडवरच हा फोन ऑपरेट होईल.

सॅटेलाइटशी कनेक्टिव्हिटी
युजर दोनपेक्षा जास्त मोबाइल नेटवर्कचा वापर करू शकेल. नेटवर्क नसल्यास फोन थेट सॅटेलाइटशी कनेक्ट करता येईल.

30 सेकंदांत प्लास्टिकचा डबा
या फोनचे बॅक कव्हर उघडण्याचा प्रयत्न केल्यास केवळ 30 सेकंदांत फोनमधील सर्व डाटा नष्ट होईल. ऑपरेटिंग सिस्टिमही काम करणार नाही. इतकेच काय, फोन सुरूही होणार नाही.