आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोइंग कंपनीकडून ड्रीमलायनरची चाचणी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन- ड्रीमलायनर विमानातील बॅटरी बिघाडाचे कारण शोधण्यासाठी बोइंग कंपनीने 787 ड्रीमलायनरची चाचणी घेतली. स्थानिक वेळेनुसार शनिवारी 12.32 वाजता सीएटलवरून विमानाने झेप घेतली. विमान आकाशात दोन तास होते.

त्याआधी हवाई वाहतूक विभागाने उड्डाणास परवानगी दिली होती. चाचणीतून बॅटरीच्या बिघाडामागची कारणे समजू शकतील, असे बोइंगचे प्रवक्ते मार्क बिरटेल यांनी सांगितले. अमेरिकी हवाई सुरक्षा विभाग बॅटरी बिघाडाची चौकशी करत आहे. त्यामुळे ड्रीमलायनर 787 मागणीची पूर्तता केली जात नाही.