आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Book Flats Online On Snapdeal, Tata And E Commerce Company In A Deal

snapdeal वर मिळणार 18-70 लाखांपर्यंत फ्लॅट; 28 ऑगस्टपासून बुकींग सुरू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: टाटाने आपल्या व्हॅल्यू होम प्रोजेक्टमधील फ्लॅट्स ऑनलाईन विकण्यासाठी ई-कॉमर्स वेबसाईट स्नॅपडीलसोबत करार केला आहे. या अंतर्गत पाच शहरांमध्ये (मुंबई, पुणे, अहमदाबाद, बेंगलुरू आणि चेन्नई) मध्ये जवळपास 1000 फ्लॅट्स ऑनलाईन विकले जातील. या फ्लॅटची बुकींग 28 ऑगस्ट सकाळी 10 वाजेपासून www.snapdeal.com वर सुरू होणार आहे. हे फ्लॅट्स 1 बीएचके पासून 3 बीएसके पर्यंत असून यांची किंमत 18 ते 70 लाख रुपये एवढी आहे. टाटा व्हॅल्यू होम्स ही टाटा हाऊसिंग डेव्हलपमेंट कंपनीचीच एक शाखा आहे. या कंपनीअंतर्गत स्वस्तात फ्लॅट विकण्याची योजना आहे.
एका वर्षापर्यंत 10 हजार रुपये मासिक भाडे
स्नॅपडीलवरून बुकींग करणार्‍या लोकांना पजेशन मिळाल्यानंतर 10 हजार रुपये प्रति महिना या दराने वर्ष भरापर्यंत गॅरंटीड भाडे मिळणार आहे. यासाठी बुकींगच्या पहिले वेबसाईटवर नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीकृत ग्राहकांना 30 हजार रुपयांमध्ये एक घर बुक करता येईल आणि त्यानंतर इतर सर्व प्रक्रीया ऑनलाईनच पुर्ण होणार आहे. जर ग्राहक फ्लॅट विकत घेत नाही तर त्याला बुकींगची रक्कम वापर मिळणार नाही. अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, या संपूर्ण व्यवहाराची माहिती वेबसाईटवर देण्यात आली आहे. टाटाच्या अधिकृत वेबसाईटवरूनही या फ्लॅट्सची बुकींग करता येईल.
43 बिलीयन डॉलरची बाजारपेठ
टाटा हाऊसिंग डेव्हलपमेंट कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष (मार्केटींग आणि सेल्स) ए. हृषिकेश म्हणाले की, रियल इस्टेटशी संबंध अललेल्या ऑनलाईन सर्चमध्ये दोन सर्च मधील एक सर्च ही प्रॉपर्टी विकत घेण्यासंबंधात असते. हृषीकेश यांच्या मते, हे क्षेत्र 43 बिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 2.6 लाख कोटी रुपयांची बाजारपेठ आहे.
पुढील स्लाईडवर वाचा... अजून कोणकोणत्या ईकॉमर्स कंपन्या करणार गुंतवणूक
झाल्यास त्यांनी या क्षेत्रातून 1400 कोटी रुपये मिळवले आहेत. यावरून ही बाब स्पष्ट होते की, भारतात ऑनलाईन शॉपिंग क्षेत्रात आपले वर्चस्व स्थापन करण्यात सर्वच कंपन्या प्रयत्नात आहेत. स्नॅपडील याच क्रमाने रियल इस्टेट व्यवसायात आपला विस्तार वाढवत आहे. त्यामुळेच टाटासोबत ऑनलाईन फ्लॅट विकण्याचा स्नॅपडीलने करार केला आहे.