आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTO - मारूती सुझुकी सियाजचे बुकींग सुरू, जाणून घ्या, काय आहेत या कारचे फीचर्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो: ऑटो एक्सपोमध्ये मारूती सियाज
नवी दिल्ली - देशातील सर्वात मोठी कार उत्पादन करणारी कंपनी मारूती सुझूकीच्या बहूचर्चित सेडान कार सियाजची मंगळवारू बुकींग सुरू झाली आहे. देशातील 1,050 शहरांमध्ये मारुतीच्या 1,370 सेल्स आउटलेट्सवर 21,000 रुपये जमा करून बुकींग करता येईल. मारूतीची सियाज ही कार येत्या महिन्यात बाजारात उतरण्याची शक्यता आहे.सेडान प्रकारातील ही कार मारूतीच्या एसएक्स 4 ची जागा घेऊ शकते. या वर्षीच्या ऑटो एक्स्पोमध्ये मारूतीने सियाजला जगासमोर आणले होते.
किंमत आणि कॉम्पिटीशन
मारूतीने सियाजच्या किंमतीबद्दल अजून कोणतीच माहिती दिलेली नाही. मात्र ऑटोमाबाईल व्यवसायातील जाणकारांच्यामते या कारची किंमत 9-12 लाख रुपयांच्या दरम्यान असू शकते. या सेगमेंटमध्ये या कारच्या स्पर्धेत होंडा सिटी आणइ ह्यूंदय वेरना ह्या आहेत.
सियाजचे वैशिष्ट्य
- सियाजमध्ये पेट्रोल आणि डिझेल असे दोन पर्याय आहेत. पेट्रोल इंजिन 1.4 लिटरचे आणि डिझेल इंजिन 1.3 लिटरचे असेल.

- सियाजमध्ये स्टेअरिंग मांडेड ऑडिओ कंट्रोल, रिव्हर्स पार्कींग सेंसर, एबीएस, हाईट एडजस्त करणारे ड्रायव्हर सीट, कारच्या मागील भागात एसी व्हेंट्स, ड्रायव्हर आर्म रेस्ट आणि इलेक्ट्रॉनिक पध्दतीने एडजस्ट होणार्‍या काचा लावण्यात आल्या आहेत.

- मारूती सुझुकीच्यामते या कारचे डिझेल मॉडेल 26.21 किलोमीटर प्रति लीटरचे एव्हरेज देते. होंडा सिटीच्या डिझेल व्हर्जन 26 किलोमीटर प्रति लीटर हे सेडान प्रकारातील कारमध्ये सर्वात चांगला पर्याय मानला जातो.

-सियाजचे पेट्रोल व्हर्जन 20.73 किलोमीटर प्रति लीटर एवढा एव्हरेज देते.

पुढील स्लाईडमध्ये पाहा, MARUTI CIAZ: