आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेअर बाजारात तेजी कायम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - रिझर्व्ह बँकेने केलेल्या व्याजदर कपातीनंतर बाजारात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातूनच काही बड्या कंपन्यांच्या समभागांची खरेदी झाल्यामुळे सेन्सेक्सने ४६ अंकांच्या वाढीची नोंद करून तो २८,१२१.८९ अंकांच्या पातळीवर बंद झाला. आठवड्यातील कामकाजाच्या अखेरच्या दिवशी सेन्सेक्सने गेल्या दोन महिन्यांतील सर्वात चांगल्या वाढीची नोंद केली.

अलीकडेच बाजारात आलेल्या तेजीचा फायदा घेत खालच्या पातळीवर झालेल्या नफारूपी विक्रीमुळे सेन्सेक्स खालच्या पातळीवर उघडला. दिवसभरात त्याने २७,९४५.३१ अंकांची खालची पातळी गाठली. परंतु नंतर झालेल्या खरेदीमध्ये सेन्सेक्स ४६.३४ अंकांनी वाढून २८,१२१.८९ अंकांच्या पातळीवर बंद झाला. या आठवड्यात सेन्सेक्सने ६६३ अंकांच्या वाढीची नोंद केली आहे.

व्याजदर कपातीबरोबरच डिसेंबरमध्ये व्यापार तूट दहा महिन्यांच्या खालच्या पातळीवर आल्यामुळे बाजाराच्या उत्साहात भर पडली. बाजारात सुरुवातीला नरमाईचे वातावरण होते, परंतु व्याजदर कपातीच्या उद्याेगांवर सकारात्मक परिणाम होण्याच्या अपेक्षेतून बाजारात खरेदीचा मूड आल्याचे मत बोनांझा पोर्टफोलिओचे सहनिधी व्यवस्थापक हिरेन
ढकाण यांनी व्यक्त केले.

टॉप गेनर्स
सन फार्मा, कोल इंडिया, हिंदुस्तान युनिलिव्हर, महिंद्रा अँड महिंद्रा, भेल, सेसा स्टर्लाइट, सिप्ला, एल अँड टी, डॉ. रेड्डीज, टाटा पॉवर, एचडीएफसी बँक