आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तेजीने म्युच्युअल फंड मालामाल, फंडांची मालमत्ता १० लाख कोटींवर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भांडवल बाजारपेठेतील वातावरण सुधारल्यामुळे म्युच्युअल फंडांच्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता ७.२ टक्क्यांनी वाढून चालू आर्थिक वर्षाच्या दुस-या तिमाहीत विक्रमी १०.६ लाख कोटी रुपयांच्यावर गेली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या जुलै ते सप्टेंबर या कालावधीत देशातील ४५ म्युच्युअल फंड कंपन्यांच्या व्यवस्थापनाखालील एकूण मालमत्ता १०.५८ लाख कोटी रुपयांवर गेली आहे. त्या अगोदच्या तीन महिन्यांत ती ९.८७ लाख कोटी रुपये होती. या मालमत्तेत तब्बल ७१ हजार कोटी रुपयांची भर पडली असल्याचे असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीमध्ये म्हटले आहे.

लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर यंदाच्या मे महिन्यात पहिल्यांदाच ही मालमत्ता १० लाख कोटी रुपयांच्या वर गेली. समभाग बाजारपेठेतील अलीकडे आलेल्या तेजीमुळे प्रामुख्याने या तिमाहीत मालमत्तेत लक्षणीय भर पडली आहे. त्याचप्रमाणे समभाग योजनांमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांचा वाढता सहभाग हेदेखील एक कारण त्यामागे असल्याचे मत उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले.