आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रारंभीच्या तेजीनंतर बाजारात पुन्हा घसरणीचे संकेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


गेल्या आठवड्यात नवे ट्रिगर न मिळाल्याने आणि अर्थव्यवस्थेप्रति नव्या चिंता व्यक्त करण्यात आल्याने अंदाजानुसार बाजार घसरणीसह बंद झाले. केंद्रीय सांख्यिकी संघटनेने (सीएसओ) चालू आर्थिक वर्षातील विकासदर घटून 5 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला. त्यामुळे अर्थव्यवस्थेबाबत गुंतवणूकदारांचा विश्वास डळमळीत झाला. त्यातच महागाईच्या बाबतीत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डी. सुब्बाराव यांनी केलेल्या भाष्यामुळे चिंतेत भर पडली. तेलाच्या किमती वाढत असताना तसेच खाद्य महागाईचा दर 10 टक्क्यांच्या वर असताना हे भाष्य आल्याने चिंता आणखी वाढली. आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी आपल्याकडे मर्यादित पर्याय असल्याचे डी. सुब्बाराव यांनी स्पष्ट केले.

गुंतवणूकदारांसाठी दिलासादायक बाब म्हणजे, चालू आर्थिक वर्षात वित्तीय तूट आटोक्यात आणण्यासाठी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी मागील पंधरवड्यात काही उपाय केले आहेत. यात ग्रामीण, संरक्षण, वीज आणि रस्ते योजनेवरील सरकारी खर्चात सुमारे 1077 अब्ज रुपयांच्या (20 अब्ज डॉलर) कपातीचा समावेश आहे. अर्थमंत्र्यांनी केंद्रीय सांख्यिकीचा अंदाज धुडकावून लावला.

औद्योगिक उत्पादनात डिसेंबरमध्ये सलग दुस-या महिन्यात आलेल्या घटीमुळे गुंतवणूकदारांच्या चिंतेत आणखी भर टाकली. गुंतवणूक आणि मागणीअभावी या उत्पादनात घसरण होत आहे. यामुळे बाजारात सुस्तीचे वातावरण राहण्याची शक्यता आहे. मात्र, सातत्याने आठ सत्रांतील घसरणीनंतर आगामी काळात तेजी दिसू शकते. आगामी दोन सत्रांत बाजारात तेजीचे वातावरण राहील. मात्र, एकंदर पाहता मर्यादित कक्षेत घसरणीचा कल राहील.
सपोर्ट आणि रेझिस्टंटचा विचार केल्यास निफ्टीला वरच्या दिशेने पुढील अडथळा 5953 या पातळीवर राहील. मात्र, हा अडथळा फारसा मजबूत नसले. निफ्टी या पातळीच्या वर बंद होणे गरजेचे आहे. या स्तरावर आणखी खरेदी होण्याची शक्यता आहे. यानंतर निफ्टीला 6010 या पातळीवर पुढील अडथळा आहे. हा तगडा अडथळा असून त्यानंतर टेक्निकल करेक्शन किंवा कन्सोलिडेशन येण्याची शक्यता आहे. जोपर्यंत निफ्टी चांगल्या व्हॉल्यूमसह या पातळीवर बंद होत नाही, तोपर्यंत त्याचा कल स्पष्ट करणे धाडसाचे ठरेल. निफ्टी 6010 च्या वर बंद झाल्यास त्यात तेजीचा कल राहील.

खालच्या बाजूने निफ्टीला पहिला आधार 5867 या पातळीवर मिळण्याची शक्यता आहे. मात्र, हा आधार फारसा मजबूत नसेल. त्याखाली बंद झाल्यास पुढील आधार 5842 पातळीवर मिळेल, हा आधार कायम राहण्याची शक्यता आहे. शेअर्सच्या बाबतीत या आठवड्यात बाटा इंडिया लिमिटेड, ग्रेसिम इंडस्ट्रीज लिमिटेड आणि लार्सन अँड टुब्रो लिमिटेड चार्टवर उत्तम दिसताहेत. बाटा इंडियाचा मागील बंद भाव 790.80 रुपये. पुढील टार्गेट 805 रुपये आणि स्टॉप लॉस 790.80 रुपये. ग्रेसिम इंडस्ट्रीजचा मागील भाव 3039.95 रुपये आहे. त्याचे पुढील टार्गेट 3078 रुपये आणि स्टॉप लॉस 2976 रुपये आहे. तर एल अँड टीचा मागील बंद भाव 1494.80 रुपये आहे. त्याचे पुढील टार्गेट 1516 रुपये आणि स्टॉप लॉस 1451 रुपये आहे.


लेखक तांत्रिक विश्लेषक आणि moneyvistas.com चे सीईओ आहेत.
Vipul.verma@dainikbhaskargroup.com