आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तेजी पुन्हा परतली, सेन्सेक्सचे शतक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबई - मंदावलेले औद्योगिक उत्पादन आणि वाढलेले महागाईचे आकडे याकडे दुर्लक्ष करत शेअर बाजाराने तेजीची किमया साधली. गेल्या आठ सत्रातील घसरणीचा सिलसिला थांबवत सेन्सेक्सने शतक ठोकले, तर निफ्टीने पाव शतकाची वाढ नोंदवली. मंगळवारी दिवसअखेर सेन्सेक्स 100.47 अंकानी वाढून 19,438.53 अंकांवर बंद झाला. तर निफ्टीने 24.65 अंकांनी वाढ नोंदवत 5.922.50
पातळी गाठली. रिफायनरी, फार्मा, सार्वजनिक उद्योग व ऑटो क्षेत्रातील समभागांवर गुंतवणूकदारांच्या उड्या पडल्या.