आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजारात तेजीचा पाऊस

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - आयटी क्षेत्रातील आघाडीच्या इन्फोसिसने जून तिमाहीत केलेल्या चांगल्या कामगिरीने बाजारात तेजीच्या धारा बरसल्या. सेन्सेक्सने 282.41 अंकांच्या कमाईसह 19,958.47 पातळी गाठली. निफ्टीने 1.25 टक्के वाढीसह सहा हजारांची महत्त्वाची पातळी ओलांडत 6009 चा स्तर गाठला. रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक, एल अँड टी, टाटा मोटर्स, डॉ.रेड्डीज लॅब, भारती एअरटेल या समभागांची जोरदार खरेदी झाली. इन्फोसिसचे समभाग 10.92 टक्के वधारले. टीसीएस, विप्रो या समभागांतही तेजी दिसून आली. जगातील प्रमुख शेअर बाजारात सकारात्मक वातावरण होते.