आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कळीचे मुद्दे नसतानाही बाजार वधारला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - वायदा सौद्यांच्या शेवटच्या दिवशी इतर कळीचे मुद्दे नसतानाही गुरुवारी शेअर बाजारात तेजी दिसून आली. सेन्सेक्स 41.88 अंकांनी वाढून 21,074.59 वर पोहोचला. निफ्टीने 10.50 अंकांच्या कमाईसह 6278.90 ही पातळी गाठली. आशियातील प्रमुख बाजारातील सकारात्मक वातावरणाने बाजाराला दिशा दिली. एचडीएफसी बँक, इन्फोसिस आणि ओएनजीसी या दिग्गज समभागांतील तेजीने सेन्सेक्सच्या वाढीत 59 अंकांचा वाटा उचलला, तर रिलायन्स इंडस्ट्रीज, टीसीएस या समभागांतील घसरणीने सेन्सेक्सच्या तेजीला लगाम लावला. बाजारातील 13 क्षेत्रीय निर्देशांकांपैकी नऊ क्षेत्रीय निर्देशांक चमकले. ब्रोकर्सनी सांगितले, वर्षअखेर आणि नाताळच्या सुट्यांमुळे विदेशी गुंतवणूकदारांची अनुपस्थिती जाणवली. त्यामुळे बाजारातील उलाढालीवर परिणाम झाला. सेन्सेक्सच्या यादीतील 30 पैकी 15 समभाग वधारले.
टॉप गेनर्स : टाटा पॉवर, ओएनजीसी, एचडीएफसी बँक, टाटा स्टील, विप्रो.
टॉप लुझर्स : बजाज ऑटो, डॉ. रेड्डीज लॅब,
हीरो मोटोकॉर्प, रिलायन्स
इंडस्ट्रीज, टाटा मोटर्स.
साखर समभागांचा गोडवा वाढला
देशातील साखर उद्योगाला व्याजमुक्त 6600 कोटी रुपये देण्यासाठी सरकारने मंजुरी दिली. परिणामी साखर उद्योगाशी निगडित समभाग तीन टक्क्यांपर्यंत वधारले. शक्ती शुगर्सचा शेअर 2.56 टक्के, तर बजाज हिंदुस्थानचा शेअर 2.33 टक्के वधारला. श्री रेणुका शुगर्सचे समभाग 1.76 टक्के, धामपूर शुगर मिल्सच्या समभागात 1.59 टक्के तेजी दिसून आली.