आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bragurain Holdings Started New Hotels In 21 City's Including Shirdi

कीज् उभारणार शिर्डीसह 21 शहरांत हॉटेल्‍स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- महाराष्‍ट्रातील महत्वाचे धार्मिक स्थळ असलेल्या शिर्डीसह देशातील 21 शहरात येत्या सहा महिन्यात न्यूयॉर्कमधील बर्ग्रुएन होल्डिंग कंपनी (कीज् हॉटेल्‍स) नवी हॉटेल सुरु करणार असल्याची घोषणा समुहाचे सल्लागार पार्थ चटर्जी यांनी पत्रकार परिषदेत केली.

घसरता रुपया ही देशातील हॉटेल उद्योगासाठी इष्टापत्ती ठरली आहे. हे लक्षात घ्यायला हवे असे नमूद करून ते म्हणाले, की दिल्लीत नुकत्याच झालेल्या सामुहिक बलात्कार प्रकरणी प्रसारमाध्यमात आलेल्या बातम्यांमुळे देशात येणारे परदेशी पर्यटकांचे प्रमाण घटले होते. ते आता वाढू लागले आहे त्यामुळे माध्यमांनी बातमी देतान अविधायक दृष्टीकोन बाळगायला हवा.

अमृतसरमधील सुवर्ण मंदिर परिसरात एक तसेच कोची, विशाखापट्टण आणि शिर्डीत येत्या तीन महिन्यात नवी हॉटेल सुरु होतील. शिर्डीतील हॉटेल 82 रूम्सचे असेल असेही त्यांनी सांगितले.

मुंबईतील रिअल इस्टेट क्षेत्रातील सेठी कुटुंबाने येथील विमाननगर भागात कीज क्लब पार्क एस्टीक हे नवे हॉटेल सुरु केले असून त्यासाठी 55 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. प्रत्येकी एक हजार चौरस फुटाच्या सहा अपार्टमेंट हे या हॉटेलचे वैशिष्ट्य आहे, अशी माहिती व्यवस्थापकीय संचालक जय अडवाणी यांनी यावेळी दिली.

सेन्ट्रल पार्क हॉटेलहेही अडवाणी समूहाच्या मालकीचे असून न्यूयॉर्कस्थित बर्ग्रुएन होल्डिंग कंपनीने पुण्यात सुरु केलेले फ्रंचायजी तत्वावरील हे पहिले हॉटेल आहे असे नमूद करून ते म्हणाले, की यामध्ये 115 रूम आहेत. बिझनेस हॉटेल म्हणून आम्ही ते पुरस्कृत करत आहोत.

लग्न समारंभ, परिषद, जिम, स्पा, स्विमिंग पूल यासह अनेक सुविधा या हॉटेलात असून एक हजार चौरस फुटाच्या अपार्टमेंटला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. अनेक कंपन्या आणि व्यावसायिक दोन लाख रुपये महिना दराने या अपार्टमेंट घेत आहेत. एक ते तीन काहीने काळासाठी त्या दिल्या जातात. आम्ही चार वर्षापूर्वी केलेली गुंतवणूक आता दुप्पट झाली असली तरी हॉटेल व्यवसायातून उत्‍पन्‍न वाढ हा आमचा हेतू आहे. हॉटेलमुळे किमान 250-300 जणांना थेट रोजगार मिळाला आहे. पुणे ही आता पॅकेज सिटी म्हणून वेगाने ओळखली जाऊ लागली आहे आणि त्याचा फायदा आम्ही घेत आहोत.