आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
डर्बन- ब्रिक्स देशांची दक्षिण आफ्रिकेतील डर्बन शहरात परिषद होत असून, ब्रिक्समधील देशांनी जागतिक पातळीवर स्वतंत्र बँक स्थापन करण्याचा निर्णय जाहीर केला. ब्रिक्समधील चीन, भारत, रशिया, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका यासारख्या महत्त्वाच्या व जगातील 43 टक्के लोकसंख्या राहत असलेल्या देशांनी उचललेल्या या पावलामुळे ब्रिक्स बॅंक भविष्यातील आणखी एक जागतिक बँक म्हणून उदयाला येईल, असा आशावाद ब्रिक्सकडून व्यक्त करण्यात आला.
या परिषदेत भारताकडून पंतप्रधान मनमोहन सिंग आणि अर्थमंत्री पी. चिदंबरम सहभागी झाले आहेत. मनमोहन सिंग म्हणाले, आम्ही ब्रिक्स देशांनी एक बँक बनवण्याचा निर्णय घेतला आहे. मला याचा आनंद होत आहे. याबाबत ब्रिक्सच्या मागे झालेल्या नवी दिल्लीतील परिषदेत याबाबत चर्चा व आराखडा तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आमचे अर्थमंत्री उर्वरित बाबींवर काम करीत आहेत. ही बँक जगभर पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी मदत करणार आहे.
दरम्यान, भारत आणि चीन यांच्यात ब्रिक्स बँकेत भागभांडवल किती असावे यावरुन मतभेद निर्माण झाले असल्याचे बोलले जात आहे. चीन १०० बिलियन डॉलर त्यात गुंतवणूक असावी असे सांगत आहे. तर भारत ५० बिलियन डॉलरची प्रत्येकांनी गुंतवावेत, असे म्हणत आहे. एखाद्या देशाचे भागभांडवल जास्त घेण्याविषयी भारताची भूमिका सावध आहे. कारण चीनने यात जास्त भांडवल घातल्यास चीन आपली मक्तेदारी दाखवेल. तसेच सध्या जी जागतिक बँक अमेरिका व युरोप लोकांच्या मनमानीवर चालते, तसाच धोका ब्रिक्सच्या संभाव्य बँकेत होईल, अशी भीती भारताला वाटते. विशेषत चीनकडून. त्यामुळे भारत-चीन यांच्यात ब्रिक्स बँकेवरुन पहिल्याच टप्प्यात मतभेद झाले असल्याचे दिसून येते. यावर इतर देश काय भूमिका घेतात व कसा तोडगा काढतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.