आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bridgestone India Private Limited To Set Up A Tyre Project In Chakan

चाकणमध्ये ब्रिजस्टोन टायर प्रकल्पाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्‍घाटन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - उद्योग आणि व्यवसायांना लागणा-या किमान शैक्षणिक पात्रतेच्या निकषाबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही असे स्पष्ट प्रतीपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे केले.

जगातील सर्वात मोठ्या टायर उत्पादक ब्रिजस्टोन कंपनीने चाकणमध्ये उभारलेल्या प्रकल्पाचे उद्‍घाटन श्री चव्हाण यांच्या हस्ते झाले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते ते पुढे म्हणाले की, राज्यात मोठ्या प्रमाणात परदेशी गुंतवणूक येते आहे. स्थानिकांना रोजगार मिळण्यात शैक्षणिक पात्रतेचे अडथळे येत असले तरी सरकार त्यात हस्तक्षेप करणार नाही, युवकांनी आयटीआय सारख्या संस्थातून शिक्षण घेऊन आपले कौशल्य वाढवावे तसेच उद्योगांनीही स्थानिकांचे जीवनमान कसे उंचावेल यावर भर देणे गरजेचे आहे.

राज्यात येणा-या उद्योगांसाठी पुरेशी वीज असून एकूण देशांतर्गत उत्पादनाची टक्केवारी पुन्हा आठ टक्क्यांवर जाली याचा मला विश्वास वाटतो. ब्रिजस्टोन कंपनीने राज्यातील दुष्काळी स्थिती लक्षात घेऊन मुख्यमंत्री मदत निधीसाठी दहा लाख रुपयांचा धनादेशही यावेळी श्री. चव्हाण यांच्याकडे सुपूर्त केला.

कंपनीच्या आगामी योजना आणि व्यवसाय संधी याविषयी माहिती देताना ब्रिजस्टोनचे व्यवस्थापकीय संचालक हिरोमी तानिगावा म्हणाले की सध्या प्रतिदिन पाच हजार कार टायरचे उत्पादन केले जाते आहे. त्यासाठी लागणारे रबर पूर्णपणे देशातून खरेदी केले जाते मात्र सिंथेटिक टायरला लागणारा कच्चा माल थायलंड, कोरिया,जपान, चीनमधून आयात केला जाणार आहे. ट्रकसाठी लागणारया टायरचे उत्पादन ऑक्टोबर २०१३ पासून सुरु केले जाणार आहे. भारताची बाजारपेठ आशिया-प्रशांत भागात सर्वात मोठी आहे आणि त्याचा फायदा आम्हाला घायचा आहे. आतापर्यंत १४०० कोटी रुपये गुंतवणूक झाली असून उर्वरित रक्कम २०१४ पर्यंत गुंतवली जाणार आहे.