आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बचतीला येणार सुगीचे दिवस, अल्पबचतीला चालना देण्यासाठी नव्या योजना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - अल्पबचतीला चालना देण्यासाठी आगामी अर्थसंकल्पात सरकार अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यानुसार पीपीएफची मुदतवाढ, विमा संरक्षणासह नवीन उत्पादने, महागाई आधारित रोख्यांचे सुधारित रूप आदी साधने केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडून जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
याशिवाय वैद्यकीय भत्त्यापोटी मिळणा-या कर सवलतीची मर्यादा वाढवण्यात येण्याची शक्यता आहे. वित्त मंत्रालयातील सूत्रांच्या मते, आगामी अर्थसंकल्पात मध्यम वर्गाला कर सवलत देण्याबरोबरच अल्प उत्पन्न गटात अल्पबचतीच्या योजना रुजवण्यासाठीच्या पर्यायावर भर राहील. मागील अर्थसंकल्पात सरकारने राष्ट्रीय किसान विकास पत्र विमा संरक्षणासह पुन्हा सुरू केले तर राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र विमा संरक्षणासह सादर केले होते. अशा स्वरुपाची पावले या वेळीही पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. मंत्रालयात अनेक योजनांवर काम सुरू असून काही दिवसांत त्यावर अंतिम निर्णय होईल.

पुढे वाचा मेडिकल रिइंबर्समेंट वाढणार