आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Britain Set To Launch The World's High Prices Laptop.

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जगातील सर्वात महागडा लॅपटॉप

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हौसेला मोल नसते, असे म्हणतात. मग कार असो वा बाइक, नाहीतर लॅपटॉप. आवडत्या वस्तूसाठी हौशी लोक कितीही पैसे मोजायला तयार असतात. हेच लक्षात घेऊन ब्रिटनच्या ल्यूवाग्लियो या संगणक निर्मिती कंपनीने एक नवा लॅपटॉप आणला आहे. त्याची किंमत हजारांत, लाखांत नव्हे तर कोटींत आहे. जाणून घेऊया या आगळ्यावेगळ्या लॅपटॉपबाबत.

का आहे खास?

हा लॅपटॉप हिरेजडित आणि हँडक्राफ्टेड आहे. त्यास 17 इंची एलईडी स्क्रीन आहे. अँटिग्लेअर रिफ्लेक्टिंग कोटिंगमुळे दिवसा उजेडीही त्याचे स्क्रीन स्पष्ट दिसते. त्यात सी.डी. ड्राइव्हऐवजी ब्ल्यू-रे ड्राइव्ह देण्यात आली आहे. तसेच त्यात अँटी-थेफ्ट तंत्रज्ञान आहे. हा लॅपटॉप कंपनीच्या निमंत्रणावरूनच ऑनलाइन विकत घेता येईल.