आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BSE Sensex Inches Up By 8 Pts In Tepid Start To New Year

शेअर बाजारात नवीन वर्षाची सावध सुरुवात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी गुंतवणूकदारांनी काही सावध भूमिका घेत व्यवहार केल्यामुळे शेअर बाजार निर्देशांक आठ अंकांनी वाढून २७,५०७.५४ अंकांच्या पातळीवर बंद झाला. बहुतांश जागतिक बाजारपेठेत नवीन वर्षानिमित्त सुटी असल्यामुळे बाजाराला दिशा देणार्‍या अशा ठोस घडामोडी घडल्या नाहीत. परंतु तरी सलग पाचव्या सत्रात सेन्सेक्सला आपली वाढ कायम ठेवता आली.

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक खालच्या पातळीवर उघडला आणि नंतर तो घसरतच राहिला. परंतु कामकाजाच्या अखेरच्या सत्रात थोडीफार खरेदीची साथ मिळाल्यानंतर सेन्सेक्समध्ये सुधारणा होऊन तो ८.१२ अंकांनी वाढून २७,५०७.५४ अंकांच्या पातळीवर बंद झाला. गेल्या पाच वर्षांत सेन्सेक्सने नुकत्याच संपलेल्या वर्षात सर्वात चांगला म्हणजे ३० टक्के परतावा दिला आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक १.३० अंकांनी वाढून ८२८४ अंकांच्या पातळीवर बंद झाला. कच्च्या तेलाच्या किमती घसरल्यामुळे रंग उत्पादक कंपन्यांच्या समभागांना मागणी आली. हवाई इंधनांच्या िकमती कमी झाल्यामुळे विमान कंपन्यांच्या समभागांनी लक्ष वेधले. ३ जी स्पेक्ट्रम लिलावासाठी आधार किंमत देण्याची शिफारस दूरसंचार नियमकांनी केल्यामुळे दूरसंचार कंपन्यांच्या समभागांचीदेखील बाजारात ट्रिंग ट्रिंग वाढली.