आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • BSE Sensex, NSE Nifty Slip For 5th Day, End At Over Two week

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सलग पाचव्या सत्रात बाजारात घसरण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शेअर बाजारात गुरुवारी चढ-उताराचा खेळ चांगलाच रंगला. सकाळच्या सत्रात तेजीने चमकणारे सेन्सेक्स व निफ्टी दुपारच्या सत्रात झालेल्या चौफेर विक्रीने दोन्ही निर्देशांक गडगडले. सेन्सेक्स ३२.१४ अंकांनी घसरून २८,८५०.९७ वर आला, तर निफ्टी १२ अंकांनी घटून ८,७११.७० झाला. दोन्ही निर्देशांकांचा हा दोन आठवड्यांचा नीचांक आहे.

सकाळच्या सत्रात सेन्सेक्सने ३९५ अंकांची उसळी मारली होती. मात्र, नंतर ऊर्जा, रिअॅल्टी आणि ग्राहकोपयोगी टिकाऊ वस्तू कंपन्यांच्या समभागांची जोरदार विक्रीमुळे ही तेजी वाहून गेली. सलग पाच सत्रांत सेन्सेक्सने ८३०.८० अंकांची घसरण अनुभवली. युरोपीय सेंट्रल बँकेने ग्रीसचे रोखे खरेदी करण्याचे रद्द केल्याचा दबावही बाजारावर दिसून आला. आशियातील जपान, तैवान, चीन, सिंगापूरसह प्रमुख बाजार घसरले, तर युरोपातील प्रमुख शेअर बाजारातही पडझड दिसून आली. सेन्सेक्सच्या यादीतील ३० पैकी २० समभाग गडगडले.

स्मॉल कॅपला फटका
बाजारात झालेल्या विक्रीचा फटका स्मॉल कॅप व मिड कॅप कंपन्यांना बसला. स्मॉल कॅप निर्देशांक १.३१ टक्क्यांनी, तर मिड कॅप निर्देशांक १.२८ टक्के घसरण झाली. किरकोळ गुंतवणूकदारांनी केलेल्या विक्रीमुळे या कंपन्यांचे समभाग गडगडले.

टॉप लुझर्स
टाटा पॉवर, सेसा स्टरलाइट, ओएनजीसी, हिंदाल्को, भेल, महिंद्रा अँड महिंद्रा, आयसीआयसीआय बँक, टाटा स्टील, सिप्ला, गेल, एनटीपीसी,मारुती, भारती एअरटेल.