आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BSE Turnover Plunges By Over Half On 3 hour Trading Disruption

सेन्सेक्स तीन तास ठप्प;तांत्रिक अडचणीमुळे 28 हजार कोटींचे नुकसान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुंबई शेअर बाजार गुरुवारी तांत्रिक अडचणीमुळे सुमारे तीन तास बंद राहिला. जवळपास अर्धा सत्र व्यवहार ठप्प राहिल्याने सुमारे 28 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले. बाजारातील हा बिघाड दूर झाल्यानंतर दुपारी झालेल्या विक्रीच्या मार्‍यात सेन्सेक्स 17.46 अंकांनी घसरला. सेन्सेक्सने गेल्या पाच दिवसांत पहिल्यांदाच घसरणीची नोंद केली.

असे झाले नुकसान
- दोन जुलै रोजी मुंबई शेअर बाजारातील (बीएसई) रोख व्यवहार विभागात 4315.78 कोटी रुपयांचे व्यवहार झाले. वायदा बाजारात एकूण 51535.93 कोटींचे व्यवहार झाले. एकूण व्यवहार 51,535.78 + 4315.93 मिळून 55851.71 कोटी रुपये.
- दोन जुलै रोजी एकूण सत्रात (6.15 तास) मध्ये एकूण 55,851.71 कोटींचे व्यवहार झाले. या हिशेबाने 3 जुलै रोजी सुमारे अर्धा सत्र (3.30 तास) तांत्रिक कारणामुळे व्यवहार बंद राहिले. त्यामुळे नुकसान 55,851.78/2 असे 27,925.85 कोटी रुपयांचे झाले.

तांत्रिक अडचण
गुरुवारी सकाळी शेअर बाजारातील मुख्य एक्स्चेंज बीएसईमध्ये तांत्रिक बिघाड झाला. सकाळी 9.30 ते दुपारी 12.30 पर्यंत व्यवहार ठप्प झाले. हे प्रथमच घडलेले नाही. यापूर्वी 11 जून रोजीही याच पद्धतीच्या तांत्रिक अडचणीमुळे बीएसईतील व्यवहार ठप्प झाले होते. अशा प्रकारची अडचण 23 दिवसांत दुसर्‍यांदा आली आहे.

बीएसईकडून खुलासा
बीएसईच्या मते, नेटवर्क आउटेजमुळे सर्व सेगमेंटमधील व्यवहार बंद करण्यात आले. एचसीएलची टीम तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी झटत होती. त्यांच्या प्रयत्नानंतर व्यवहार पूर्ववत झाले. बीएसईचे सीईओ आशिष चौहान यांनी सांगितले, सेबीने या सर्व प्रकाराचा अहवाल मागितला आहे.
पुढे वाचा,पाच सत्रांनंतर सेन्सेक्सची घसरगुंडी...
(फोटो - संग्रहित छायाचित्र)