आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ब्रॉडबँड व्यवसायास गती देण्याची बीएसएनएलची तयारी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार सेवा देणारी कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) चालू आर्थिक वर्षात देशांतर्गत पातळीवर ब्रॉडबँड व्यवसाय वाढवण्याच्या तयारीत आहे. त्याअंतर्गत सेवा विस्तारासाठी 9 हजार कोटींची गुंतवणूक करण्याची तयारी कंपनीने केली आहे. या गुंतवणुकीचा मोठा भाग मोबाइल व ब्रॉडबँड क्षेत्रात नवे तंत्रज्ञान खरेदी करण्यावर खर्च केला जाणार आहे. बीएसएनएल सध्या ब्रॉडबँड क्षेत्रात देशातील सर्वात मोठी कंपनी असून सध्या तिच्याकडील ब्रॉडबँड ग्राहकांची संख्या 90 लाखांच्यावर आहे.
बीएसएनएलच्या एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले की, 2012 -13 या आर्थिक वर्षात कंपनी सर्वाधिक लक्ष ब्रॉडबँड व मोबाइल क्षेत्राच्या विस्तारावर केंद्रीत करणार आहे. त्यासाठी कंपनी 9 हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. या गुंतवणुकीचा सर्वाधिक हिस्सा ब्रॉडबँड सेवेच्या विस्तारावर खर्च केला जाणार आहे. ब्रॉडबँड सेवेच्या माध्यमातून महसुलात वाढ करण्यासाठी मूल्यवर्धित सेवांवर (व्हॅल्यू अ‍ॅडेड सेवा) कंपनी विशेष लक्ष केंद्रीत करणार आहे. मूल्यवर्धित सेवेमध्ये गेम्स ऑन डिमांड, म्युझिक ऑन डिमांड, एज्युकेशन ऑन डिमांड, फन, जोक्स तसेच इतर आदींच्या माध्यमातून कंपनी 20 टक्के वाढीव महसूल गोळा करणार आहे.
अधिका-याने सांगितले की, कंपनी व्यक्तिगत ग्राहकांव्यतिरिक्त एंटरप्रायझेस बिझनेसवर विशेष भर देणार आहे. कंपनीला एंटरप्रायझेस व्यवसायाच्या माध्यमातूनच सर्वाधिक महसूल प्राप्त होतो व वरचेवर त्यात वाढच होत आहे. त्यामुळे त्यावर लक्ष केंद्रित करून यासाठी कंपनी स्वतंत्र टीम तयार करून त्यांना अनिवार्य प्रशिक्षण देणार आहे. कंपनी प्रायोगिक तत्त्वावर ग्रामीण भागात काही सेवा नव्याने सुरू करणार आहे.
कंपनीचे उद्दिष्ट
* कंपनी चालू आर्थिक वर्षात 9,000 कोटींपेक्षा अधिक रकमेची गुंतवणूक करणार.
* याचा सर्वाधिक हिस्सा मोबाइल व ब्रॉडबँड सेवांच्या विस्तारासाठी करणार.
* ब्रॉडबँड सेवांच्या माध्यमातून महसूल वाढवण्यासाठी मूल्यवर्धित सेवांवर कंपनी फोकस.
* वैयक्तिक ग्राहकांशिवाय कंपनी एंटरप्रायझेस बिझनेसवर कंपनीचा भर
बेस प्राइसमुळे फारसा प्रभाव नाही : उपाध्याय
तिरुचिरापल्ली । 2 जी स्पेक्ट्रमसाठी निश्चित करण्यात आलेल्या 14,000 कोटींच्या बेसप्राइसमुळे बीएसएनएलवर परिणाम होणार नसल्याचे बीएसएनएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आर. के. उपाध्याय यांनी सांगितले. टेलिकॉम क्षेत्रातील नियंत्रण संस्था प्राधिकरणने मोबाइल कंपन्यांसाठी बेस प्राइस ठरवताना ट्रायच्या अनेक शिफारशी तसेच इतर मुद्द्यांचा अभ्यास केला आहे व त्यानंतरच हे मूल्य निश्चित केले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.