आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीएसएनएलही बनले स्मार्ट, वाजवी स्मार्टफोनची श्रेणी सादर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- स्मार्टफोन बाजारपेठेच्या विस्तारातील हिस्सा आता प्रत्येक कंपनीला हवाहवासा वाटू लागला आहे. विशेष करून खिशाला परवडणार्‍या स्मार्टफोनची वाढती मागणी लक्षात घेऊन आता सार्वजनिक क्षेत्रातली भारत संचार निगम लिमिटेड कंपनीही (बीएसएनएल) नवे मोबाइल फोन बाजारात दाखल करून ‘स्मार्ट’ झाली आहे.
नजीकच्या काळात फीचर फोनचे अनेक ग्राहक स्मार्टफोनकडे वळण्याची शक्यता लक्षात घेऊन बीएसएनएलने पँटेल टेक्नॉलॉजीज या टॅब्लेट आणि स्मार्टफोन उत्पादक कंपनीच्या मदतीने ‘पेंटा’ या र्शेणीतील नवे मोबाइल बाजारात आणले आहेत. इंटरनेटचा वापर सहज करता येऊ शकेल, अशा प्रकारे तयार करण्यात आलेला हा भारत पेंटा मोबाइल आहे. बीएसएनएलने या मोबाइलसाठी व्हॉइस प्लॅनची 1200 मिनिटेही देण्यात आली आहेत. दर महिन्याला 100 मिनिटांचा मोफत टॉकटाइम 12 महिन्यांसाठी असे याचे स्वरूप आहे. या नव्या मोबाइलमध्ये 15 जीबीचे क्लाऊड स्टोअरेज, डॉक्युमेंट्स टू गोसारखी आकर्षक अँप्लिकेशन्स, गुगल ड्राइव्ह इत्यादी सुविधा आहेत. सर्वसामान्यांना परवडू शकणारी ही नवी मोबाइलची श्रेणी बाजारात स्वीकारली जाईल, असा विश्वास पेंटल टेक्नॉलॉजीजचे व्यवस्थापकीय संचालक विजेंदर सिंग यांनी व्यक्त केला.

फीचर्स आणि किंमत जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करा...