आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीएसएनल लवकरच होणार रोमिंगमुक्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) आणि महानगर टेलिकॉम निगम लिमिटेड (एमटीएनएल)च्या मोबाइल ग्राहकांसाठी खुशखबर आहे. बीएसएनएल, एमटीएनएलच्या ग्राहकांना लवकरच देशभरात मोफत रोमिंगची सुविधा मिळणार आहे. दूरसंचार मंत्री कपिल सिब्बल यांनी सादर केलेल्या या प्रस्तावास केंद्रीय मंत्रिमंडळाने ग्रीन सिग्नल दिले आहे. यासंदर्भात दोन्ही कंपन्यांच्या अधिकार्‍यांना लवकरच निर्देश जारी करण्यात येणार आहेत.

सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, पाच राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी लागू करण्यात आलेल्या आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये म्हणून याप्रकरणी केंद्र सरकार निवडणूक आयोगाचा सल्ला घेणार आहे. 10 डिसेंबरपासून ही सुविधा देशभरात सुरू होण्याची शक्यता आहे. सरकारच्या या पावलामुळे एअरटेल, वोडाफोन, रिलायन्स आणि आयडियासारख्या खासगी मोबाइल कंपन्यांवरही रोमिंग नि:शुल्क करण्यासाठी दबाव वाढू शकतो.