Home | Business | Gadget | bsnl started vip services

बीएसएनएलची व्हीओआयपी सेवा सुरू

वृत्तसंस्था | Update - Jul 19, 2011, 01:42 AM IST

बीएसएनएल ग्राहकांसाठी इंटरनेटवरून दूरध्वनी आणि दृकश्राव्य सेवा देण्यास प्रारंभ केला आहे.

  • bsnl started vip services

    नवी दिल्ली. भारत संचार निगम लिमिटेडने साई इन्फोसिस्टिमसह बीएसएनएल ग्राहकांसाठी इंटरनेटवरून दूरध्वनी आणि दृकश्राव्य सेवा देण्यास प्रारंभ केला आहे.

    सध्या वापरात असलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सेवेच्या तुलनेत बीएसएनएलची ही दृकश्राव्य सेवा अत्यंत वाजवी आहे. विदेशातही वाजवी खर्चात संपर्क साधण्यासाठी आघाडीच्या आंतरराष्ट्रीय सेवा पुरवठादारांसोबत विशेष व्यवस्था केली जात असल्याची माहिती बीएसएनएलचे सीएमडी आर. के. उपाध्याय यांनी दिली आहे. व्हीव्हीओआयपी सेवा वापरून अमेरिका, ब्रिटन व चीनमध्ये दूरध्वनीवर संपर्क साधण्यासाठी १ रुपया २० पैसे प्रतिमिनिट तर तेथील मोबाइलवर संपर्क साधण्यासाठी ७ रुपये २० पैसे प्रतिमिनिट आकारले जातील. व्हीव्हीओआयपीसाठी मासिक १५० रुपये आकारले जातील, असे त्यांनी सांगितले. ही सेवा अहमदाबादेतून सुरू होऊन त्यानंतर महाराष्ट्र व छत्तीसगडमध्ये कार्यान्वित होणार आहे.Trending