आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BSNL Tie Up With Champinon Company New Smartphone

नव्या स्मार्टफोनसाठी बीएसएनएलचा चॅम्पियन कंपनीशी करार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - महानगरांपलीकडच्या शहरांमध्येही स्मार्टफोनचा वाढता वापर लक्षात घेऊन सार्वजनिक क्षेत्रातील भारत संचार निगम लिमिटेडने चॅम्पियन या कंपनीशी सहकार्य करून पुढच्या पिढीतील अत्याधुनिक फोन बाजारात आणले आहेत.
बँकिंग तसेच इतर रोजची कामे मोबाइलवर झटपट होत असल्याने इंटरनेटवर आधारित उपाययोजनांचा वापर खूप होत आहे. बीएसएनएलने चॅम्पियन कॉम्प्युटर्ससोबत काही साधनांच्या विक्रीसाठी करार केला असून त्यांनी टॅब्लेटसाठी एक खास 3जी डाटा प्लॅन जाहीर केला आहे. त्यात मासिक 500 एमबी मोफत डाटा आणि 50 मिनिटे ऑन-नेट व्हॉइस कॉल्स सहा महिन्यांसाठी दिले जाणार असल्याचे बीएसएनएलचे संचालक अनुपम र्शीवास्तव यांनी सांगितले.
द्वितीय आणि तृतीय र्शेणी शहरातील ग्राहक टेक्नोसॅव्ही बनत आहेत. त्यामुळे अशा प्रकारच्या उत्पादनांसाठी या बाजारपेठेत चांगली मागणी असल्याचे चॅम्पियन कॉम्प्युटर्स प्रा. लि.चे व्यवस्थापकीय संचालक कपिल वाधवा यांनी सांगितले.
बीएसएनएल चॅम्पियन माय फोन एसएम 3512
० अँड्रॉइड व्ही. 4.2.2 (जेली बीन)
० ड्युएल कोअर प्रोसेसर
० ड्युएल सिम (जीएसएम आणि जीएसएम)
० वारंवारिता जीएसएम 900/1800 मेगाहटर््झ
० 3.5 इंच स्क्रीन (8.9 सें.मी.)
० 32 जीबीपर्यंत विस्तारित होणारी मेमरी
० ड्युएल कॅमेरा (फ्रंट 1.3 एमपी, मागील 3 एमपी)
० टॉकटाइम 6 तासांपर्यंत
० स्टँडबाय कालावधी 350 तास
० एफएम आणि एफएम रेकॉर्डिंग
० वायफाय, जी सेन्सर
० बॅटरी ली आयन (1300 एमएएच)
किंमत : 3,225 रुपये
बीएसएनएल चॅम्पियन माय एसएम 3513-3 जी
० अँड्रॉइड व्ही. 4.2.2 (जेली बीन)
० ड्युएल कोअर प्रोसेसर
० ड्युएल सिम (जीएसएम, जीएसएम)
० 3जी जीएसएम 900/1800 मेगाहर्ट्झ, डब्ल्यूसीडीएमए 2100
० 8.9 सेंमीची (3.5 इंची) टच स्क्रीन
० 32 जीबीपर्यंत वाढवली जाऊ शकणारी मेमरी
० ड्युएल कॅमेरा (फ्रंट 1.3 एमपी, मागील 3 एमपी)
० सहा तासांपर्यंत टॉकटाइम
० स्टँडबाय टाइम 350 तास
० एफएम आणि एफएम रेकॉर्डिंग
० वायफाय, जी सेन्सर
० बॅटरी ली आयन (1300 एमएएच)
किंमत : 4,499 रुपये