आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : बुल आणि बीअर; शेअरबाजारात का वापरली जातात ही दोन प्रतिके

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेअर बाजारात बुल ( बैल) आणि बीअर (अस्वल) हे शब्द सारखे वापरले जातात. बैल आणि अस्वलाचा शेअर बाजाराशी नेमका काय संबंध. शेअरबाजारात ही प्रतीके कशी आलीत, या विषयाची ही रंजक माहिती.

पहिली धारणा
अमेरिकेतील आर्थिक सेवा कंपनी ‘मोटली फुल’च्या मते अस्वल (बीअर) जेव्हा कशावरही हल्ला करतो, त्या वेळी त्याच्या पंजाची स्थिती खाल्याच्या दिशेला असते. त्यामुळे कोसळणार्‍या बाजाराचे प्रतीक म्हणून अस्वलाची निवड करण्यात आली आहे. अस्वलाच्या पंज्याचा वार एवढा शक्तिशाली असतो की, त्याला निदान त्या वेळी तरी रोखणे शक्य नसते. हीच स्थिती शेअर बाजारातील घसरणीची असते. बाजारात एकदा घसरण सुरू झाली की, त्याला लगेच थांबवणे शक्य नसते. याच्या उलट जेव्हा बुल (बैल) आक्रमण करण्याच्या तयारीत असतो, त्या वेळी त्याची शिंगे वरच्या दिशेला असतात. म्हणून उसळत्या बाजाराला बैलाचे प्रतीक दिले जाते.