आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business Article On Federal Bank And Reserve Bank

फेडरल रिझर्व्ह आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे पतधोरण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फेडरल रिझर्व्ह बँकेच्या निर्णयाने जगभरातील शेअर बाजारातील उसळी

मागच्या आठवड्यात अमेरिका आणि भारताच्या मध्यवर्ती बँका अनुक्रमे फेडरल रिझर्व्ह आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांनी आपापल्या पतधोरणांची घोषणा केली. अमेरिकेचे फेडरल रिझर्व्हर्चे अध्यक्ष बेन बर्नान्के यांनी अमेरिका येणार्‍या काळात अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याकरिता सुरू असलेला 85 अब्ज डॉलर दर महिन्याचा बाँड खरेदी कार्यक्रम (क्युई 3) सुरूच राहू देणार असल्याची पुष्टी करताच जगभरातील शेअर बाजारामध्ये उसळी आली. यामुळे रुपयासुद्धा वधारला. कारण या घोषणेने अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत अधिक प्रमाणात डॉलर उपलब्ध होतील. तेथील व्यापारी आणि गुंतवणूकदारांना या पैशांचा उपयोग स्वत:च्या अर्थव्यवस्थेसोबतच जगातील इतर अर्थव्यवस्थेत गुंतवणुकीसाठी उपलब्ध झाला आहे.

0 राजन यांचा निर्णय रुपयाच्या दृष्टीने चांगला, मात्र कर्ज महागणार

परंतु रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी भारतातील ठोक आणि ग्राहक महागाई दर आटोक्यात आणण्यासाठी रेपो दरामधे 0.25} वाढ केली. यामुळे आता रेपो दर आणि रिव्हर्स रेपो दर हे दोघे अनुक्रमे 7.25} आणि 6.25} वरून 7.50} आणि 6.50} इतके झाले आहेत. यामुळे बँकांना आरबीआयकडून मिळणार्‍या कर्जाचा दर 0.25} वाढला. याचा परिणाम शेअर बाजारात झालेल्या घसरणीमधून पाहायला मिळाला. स्थावर मालमत्ता, वाहन क्षेत्राला याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. कारण या निणर्याने बँकांकडून मिळणारे गृह आणि वाहन कर्ज महाग होण्याची दाट शक्यता आहे. रुपयाच्या दृष्टीने हा निर्णय एका अर्थाने चांगला आहे. कारण यामुळे बाजारात रुपयाची कमतरता निर्माण होईल, तरलता सुधारेल आणि रुपयाला स्थिरता प्राप्त होण्यास मदत होईल. हा निर्णय सगळ्यांसाठी आश्चर्यदायक होता. महागाई दर आणि विकास याच्यामध्ये आरबीआय समन्वय राखण्याचा प्रयत्न करेल, असे सर्वांना वाटत होते. पण या निर्णयाने रघुराम राजन यांचा कल महागाई दर आटोक्यात आणण्याकडे असल्याचे स्पष्ट झाले. याचसोबत रिझर्व्ह बँकेने मार्जिनल स्टँडिग फॅसिलिटी दर म्हणजे बँकांच्या एकूण मागणी आणि काळ दायित्वावर बँकांना रिझर्व्ह बँकेकडून 2} पर्यंत कर्ज मिळण्याच्या दरामधे 0. 75} कपात करण्यात आली. यामुळे हा दर 10.25} वरून 9.50} इतका झाला. साधारणत: या दराचा वापर बँका ग्राहकांना मोठय़ा प्रमाणावर त्वरित कर्ज देण्याकरिता भांडवल उपलब्ध व्हावे म्हणून करतात. हा दर रेपो दरापेक्षा 2} अधिक ठेवण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे.

0 काही काळाकरिताच काही क्षेत्रांना फटका बसेल

या सर्व घटना भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वच्या आहेत. ऑगस्ट महिन्यात ठोक महागाई दर 6. 1} होता. फेडरल रिझर्व्ह आणि आरबीआयच्या निणर्यांनी महागाई दर आटोक्यात येईल, रुपयाच्या मूल्यांकनात सुधारणा, सोने-चांदीच्या भावात घसरण आणि व्याजदर वाढीमुळे कर्ज महाग होऊन अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रामधील विकासगतीला काही काळाकरिता खीळ बसण्याची शक्यता आहे.

chaitanyavwangikar@gmail.com

(लेखक स्ट्रॅटमॅन कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे संचालक आहेत)