आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business News In Marathi About Franklin Templeton

फ्रँकलिन टेम्पल्टनचा नवा फंड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - फ्रँकलिन टेम्पलटन इन्व्हेस्टमेंट्सने फ्रँकलिन इंडिया बँकिंग आणि पीएसयू डेट फंड (एफआयबीपीडीएफ) हा नवा नवीन ओपन-एण्ड इन्कम फंड बाजारात आणला आहे. डेट आणि प्रामुख्याने बँका तसेच सरकारी कंपन्यांचे शेअर्स आदी वित्तीय साधनांमध्ये गुंतवणूक करून गुंतवणूकदारांना नियमित उत्पन्न मिळवून देण्यासाठी या फंडची रचना करण्यात आली आहे.
हा फंड गुंतवणुकीची क्रियाशील पद्धत अवलंबणार असून त्याचा प्राथमिक भर हा डेट आणि प्रामुख्याने बँका तसंच सरकारी कंपन्यांचे शेअर्स आदी वित्तीय साधनांवर असेल. अधिकाधिक वाढता परतावा मिळवणे आणि रोखासंग्रहातील व्याजदरांचे चढ-उतार शक्य तेवढे कमी करणे हे या फंडाचे मुख्य उद्दिष्ट आहे. प्रामुख्याने नामांकित वित्तीय साधनांमध्ये गुंतवणूक करून क्रेडिट रिस्क कमीत कमी ठेवण्याचा फंड मॅनेजरचा प्रयत्न असेल. गिल्ट सिक्युरिटीज आणि राज्य विकास कर्जांमध्ये गुंतवणूक करून फायदा, सुरक्षा आणि रोकड सुलभता यांच्यामध्ये समानता राखण्याचाही प्रयत्न केला जाईल. नवीन फंड ऑफरची विक्री 2 एप्रिल 2014 ते 16 एप्रिल 2014 दरम्यान होत असून पुनर्विक्रीची तारीख : 28 एप्रिल, 2014 रोजी आहे. यादरम्यान 10 रु. प्रतियुनिट या दराने या फंडचे युनिट्स विक्रीला उपलब्ध असतील. त्यात किमान गुंतवणूक 5000 रु. आणि त्यापुढे 1 रुपयाच्या पटीत गुंतवणूक करता येईल. सध्याच्या परिस्थितीत देय आणि प्राथमिक देणी तसेच व्हॉल्युम्सच्या बाबतीत बँका आणि सरकारी कंपन्या यांचे कॉपोर्रेट रोखे बाजारात वर्चस्व आहे. नियमन रचना आणि मालकीमुळे बँका आणि सरकारी कंपन्यांनी जारी केलेल्या डेट तसेच इतर वित्तीय साधनांमधल्या गुंतवणुकीतली जोखीम इतर निश्चित परतावा साधनांच्या तुलनेत कमी असते, असे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक विवेक कुडवा यांनी सांगितले.