आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कच्चे तेल स्वस्ताईने ‘अच्छे दिन’चे संकेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - जागतिक बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतींनी घसरणीचा सूर लावला आहे. हा कल असाच कायम राहून नजीकच्या काळात इंधन अनुदानाचे प्रमाण घटले तर वित्तीय तूट कमी होण्यास मदत होणार आहे. पर्यायाने सरकारच्या डोक्यावरील कर्जाचा भार कमी होऊन व्याजदर कपात करणे शक्य होणार आहे. तसेच इंधन आयातीवर होणारा प्रचंड खर्च कमी झाल्याने हा पैसा विकासकामांसाठी वापरण्याचा मार्गही मोकळा होणार असल्याने देशात अच्छे दिन आणण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

सरकारी खर्च आणि सरकारचा महसूल यांच्यातील तफावत ही वित्तीय तूट म्हणून ओळखली जाते. इराकमधील अशांतता, लिबिया, युक्रेनमधील तणाव आणि गाझापट्टीत झालेले हल्ले, अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेतील वाढ या गोष्टी लक्षात घेता जागतकि बाजारात कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या होत्या. यंदाच्या जून महिन्यात प्रतिबॅरल ११५ डॉलरवर गेलेल्या कच्च्या तेलाच्या किमती जवळपास ११ टक्क्यांनी घसरून प्रतिबॅरल १०२ डॉलरवर आल्या. मंगळवारी या किमतींनी तेरा महिन्यांचा नीचांक गाठला.

कच्च्या तेलाच्या किमती जवळपास १००.१ डॉलरवर आल्या असल्या तरी त्यात आणखी घट होण्याची शक्यता आहे. अमेरिकेत तेल साठे मिळाल्यामुळे हा देश स्वत:च आता एक प्रमुख उत्पादक देश बनला आहे. त्यामुळे इंधन पुरवठ्याचा आता प्रश्न नाही. गाझा, इराकमधील परिस्थिती तणावपूर्ण असली तरी त्याचा इंधन पुरवठ्यामध्ये अडथळा येणार नाही.
वर्षाच्या प्रारंभी युरोपमधील परिस्थिती सुधारली असली तरी गेल्या महिनाभरात इटली, फ्रान्सची आर्थिक वाढ मंदावली आहे. परिणामी या विभागातील तेलाची मागणी घटली आहे. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमती उतरल्या असल्याचे आयोजित बीएनपी परिबासचे गुंतवणूक सल्लागार डॉ. व्ही.के. विजयकुमार यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.