आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business News In Marathi, Express Car Wash, Divya Marathi

पाच लाखांत सुरू करा कार मेंटेनन्सचा व्यवसाय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - छोट्या-मोठ्या सर्वच शहरांमध्ये झपाट्याने कार विक्री होत असल्यामुळे या क्षेत्रात व्यवसायाच्या नवनवीन संधी निर्माण झाल्या आहेत. कार वॉश आणि मेंटेनन्स हे त्यापैकीच एक क्षेत्र आहे. ऑटोज स्पा, कार्जस्पा आणि एक्स्प्रेस कार वॉश यासारख्या काही ब्रँड्सनी उदयोन्मुख व्यावसाियकांना या क्षेत्रात उतरण्याची संधी दिली आहे. जर तुमच्याकडे ठरावीक जागा आणि पाच लाख रुपयांपर्यंत गुुंतवणूक करण्याची क्षमता असेल, तर तुम्ही या क्षेत्रात उतरू शकता.

ऑटोज स्पासाठी ५-१० लाख
ऑटोज स्पा हा कार वॉशशी संबंधित असलेला सुरतमधील ब्रँड आहे. प्रोफेशनल क्लीनिंग, कार सफाई, शायनी, ग्लॉसी आणि जर्म फ्री आदींच्या सेवा देण्यासाठी हे ब्रँड प्रसिद्ध आहेत. या ब्रँडने सध्या लोकांसाठी ऑफर आणली आहे. या ब्रँडची फ्रँचायझी घेण्यासाठी सुमारे १ हजार वर्गफूट जागा आणि ५ ते १० लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करावी लागेल. फ्रँचायझी किंवा ब्रँड शुल्क म्हणून १.५ लाख रुपये द्यावे लागतील. फ्रँचाइझ इंडियाच्या मते, ऑटोज स्पाजच्या फ्रँचायझी युनिटचा पे बॅक कालावधी ८ महिन्यांपासून ते एक वर्षापर्यंत असू शकतो.

कार्ज स्पा इंिडयाच्या फ्रँचायझीसाठी ९ ते १० लाख
कार केअर, मशीन्स व उपकरणांच्या देखभालीसाठी लोकप्रिय असल्याचा दावा कार्ज स्पा इंिडया ब्रँडने केला आहे. हा ब्रँड एक्स्टेरिअर स्टीम, शॅम्पू वॉश, इन्टेनि्सव्ह इंटेरिअर क्लीनिंग, जर्मफ्री इंटेरिअर्ससाठी ओझोन एअर प्युरिफिकेशन, लेदर कंडिशनर/ प्रोटेक्शन, पेंट रिफाइनमेंट व कोटिंग सिस्टिम्स, अलॉय व्हील पॉिलश आदी सेवा देतो. याच्या फ्रँचायझीसाठी ७५० ते १ हजार वर्गफूट जागा तसेच ९ ते १० लाखांपर्यंतची गुंतवणूक आवश्यक आहे.

एक्स्प्रेस कार वॉश : मर्कंडाइज्ड क्लीनिंगसाठी प्रसिद्ध
मॅनमशीन ग्रुपने युनिक मर्कंडाइज्ड कार क्लीनिंग ही संकल्पना अस्तित्वात आणली. हायप्रेशर क्लीनिंग मशीन, स्प्रे अॅक्ट्रेशन मशीन्ससारख्या अत्याधुनिक उपकरणांच्या माध्यमातून हे ब्रँड कार वॉिशंगची सेवा प्रदान करते. कंपनी व्यवस्थापनाच्या मते, आऊटलेट लोकशन, िबझनेस पोटेन्शिअल आणि मॉडेलसाठी १२ ते २० लाखांपर्यंतची गुंतवणूक आणि १ हजार ते दीड हजार वर्गफुटांपर्यंत जागा आवश्यक आहे. याचा परतावा साधारण वर्षभराच्या आत होऊन जातो, असे फ्रँचाइझ इंडियाचे मत आहे.