आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुंतवणूकदारांच्या श्रीमंतीत 1.73 लाख कोटी रुपयांची भर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - भांडवल बाजारात आलेला विदेशी निधीचा चांगला ओघ, समभागांच्या किमतीत झालेली वाढ यामुळे नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षामध्ये गुंतवणूकदारांची श्रीमंती जवळपास 1.73 लाख कोटी रुपयांवर वाढून ती 63.78 कोटी रुपयांवर गेली आहे. या वर्षात सेन्सेक्सने 1,431.57 अंकांची उसळी घेतली होती.
बाजारातील तेजीच्या वातावरणामुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीमध्ये 172,945 कोटी रुपयांची भर पडून ती अगोदरच्या वर्षातल्या याच कालावधीतील 62,14,941 कोटी रुपयांवरून 63,87,886 कोटी रुपयांवर गेली आहे 2012 च्या वर्षात गुंतवणूकदारांची श्रीमंती 27 टक्क्यांनी वाढून ती 67.7 लाख कोटी रुपयांवर गेली आहे; परंतु चालू वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सेन्सेक्सने 745 अंकांनी आपटी खाल्ली. यूपीए सरकारमधील प्रमुख घटक पक्ष असलेल्या द्रमुकने काढून घेतलेला पाठिंबा, सायप्रसमुळे युरोझोनमधील आर्थिक पेचप्रसंगाचा लटकत असलेला गुंता आणि मध्यावधी निवडणुकांना सामोरे जाण्याची भीती यामुळे गुंतवणूकदारांची मानसिकता कमी झाली. विदेशी संस्थांनीदेखील थांबा आणि वाट पाहा पर्याय स्वीकारल्याचे मत युनिकॉन सर्व्हिसेसचे सीईओ गजेंद्र नागपाल यांनी व्यक्त केली.