आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business World Disappointed About Land Aquasition Bill

भूसंपादन विधेयकावर उद्योग जगतात नाराजी, मूलभूत विकास खुंटण्‍याची शक्यता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - लोकसभेत मंजूर करण्यात आलेल्या भूसंपादन विधेयकाविषयी उद्योग जगतात नाराजी असून यामुळे देशाच्या औद्योगिक आणि मूलभूत विकासावर नुकसानदायक परिणाम होऊ शकतो, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया उद्योग क्षेत्रात उमटत आहेत. लोकसभेत हे विधेयक नुकतेच मंजूर करण्यात आले असून ते 1894 च्या ब्रिटिश काळातील अधिनियमाच्या जागी लागू होईल.


अधिनियमानुसार ज्या कंपन्यांना औद्योगिक वापरासाठी जमीन विकत घ्यायची आहे, त्यांना ग्रामीण क्षेत्रातील जमिनीसाठी त्या वेळच्या बाजारदराच्या तुलनेत चारपट तर शहरी भागात दुप्पट किंमत मोजावी लागणार आहे. इतकेच नव्हे तर जमीन विक्रेत्यांच्या परवानगीसाठीही काही नियम बनवण्यात आले आहेत. सार्वजनिक योजनांसाठी जमीन खरेदी करण्यापूर्वी 70 टक्के लोकांची तर खासगी कंपन्यांसाठी 80 टक्के लोकांची परवानगी असणे अनिवार्य आहे. याविषयी औद्योगिक क्षेत्रातून अनेक प्रतिक्रिया उमटल्या आहेत. उद्योग चेंबर फिक्कीचे माजी अध्यक्ष आर.व्ही. कनेरिया यांनी सांगितले की, या विधेयकातील अनेक तरतुदींमुळे आधीच वाईट स्थितीत असलेल्या देशातील औद्योगिक विकासावर प्रतिकूल परिणाम होईल. हे एक प्रतिगामी पाऊल असल्याचे त्यांनी म्हटले. मॅन्युफॅक्चरिंगसाठी आवश्यक उत्पादने यामुळे दुर्मिळ आणि महाग होतील, असे फिक्कीकडून सांगण्यात आले आहे. हे योग्य पाऊल नसून या विधेयकामुळे जमिनीच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ होईल आणि खरेदी प्रक्रियादेखील क्लिष्ट होईल, असे फिक्कीकडून सांगण्यात आले आहे. सध्याच्या काळात मोठमोठ्या योजना अडचणीत आहेत आणि जागतिक स्पर्धेत भारत मागे पडत आहे. अशात भूसंपादनाशी संबंधित सरळ प्रक्रिया गुंतवणुकीला चालना देण्यासाठी योग्य ठरू शकते, असे मत भारतीय उद्योग संघाचे (सीआयआय) अध्यक्ष गोपालकृष्णन यांनी मांडले आहे.


पंतप्रधानांनी मोठी पावले उचलावीत
पंतप्रधानांनी भांडवल नियंत्रणाचे जे आश्वासन दिले होते त्याच्या सुधारणेशी निगडित बाबींसाठी कडक निर्णय घ्यावे, असे मत पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या भाषणावर इंडिया इंककडून मांडण्यात आले आहे. फिक्कीचे अध्यक्ष नैना लाल किडवई यांनी सांगितले की, आवश्यक सुधारणा करण्याची आणि गुंतवणूकदारांत नवा उत्साह निर्माण करण्याची गरज आहे.