आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयफोन 5 साठी दोन वर्षे महिन्याला 2, 999 रु. भरा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- अमेरिका आणि युरोपप्रमाणेच देशातही हायएंड स्मार्टफोनच्या खरेदी-विक्रीचा ट्रेंड सुरू झाला आहे. आता 16 जीबीचा आयफोन ‘5 एस’ दर महिन्याला 2 हजार 999 रुपये तर ‘5 सी’ ची खरेदी 2 हजार 599 रुपये देऊन केली जाऊ शकते. हे दोन्ही फोन शुक्रवारी भारतात औपचारिकपणे लाँच झाले. आयफोनची खरेदी करणा-यांसाठी दोन वर्षांची परतफेडीची मुदत असेल. डाउनपेमेंट देण्याची गरज भासरणार नाही. दर महिन्याच्या निश्चित रकमेत फोनची किंमत सामील असेल. सोबतच अमर्याद लोकल-एसटीडी कॉल, एमएमएस, नॅशनल रोमिंग व 3-जी डेटा युसेजची देखील सुविधा असेल. आयफोन 5 सीची सुरूवातीची किंमत 41 हजार 900 रुपये असेल. 5 एसची किंमत 53 हजार 500 रूपयांपासून सुरू होईल. धनत्रयोदशीच्या दिवशी या फोनच्या लाँचिंग होताच रिलायन्सच्या आउटलेट्सवर ग्राहकांच्या रांगा लागल्या होत्या.


ही आहे खरी किंमत

आयफोन 5 सी
16 जीबी ५ 41, 900
32 जीबी ५ 53, 500
आयफोन 5 एस
16 जीबी ५ 53, 500
32 जीबी ५ 63, 500
64 जीबी ५ 71, 500

गुगलकडून नेक्सस-5 व नेक्सस-7 च्या किमती जाहीर... वाचा पुढे