आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेअर बाजारात खरेदीला उधाण, तेजीची कमान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - केंद्र सरकारने जीडीपीची वाढ ५.५ टक्क्यांपर्यंत होण्याचा अंदाज व्यक्त केल्यामुळे बाजाराला मोठा दिलासा मिळाला. जागतिक बाजारातील तेजीच्या वातावरणामुळे सलग दुस-या दिवशी खरेदीचा जोर कायम राहून सेन्सेक्सने २४५ अंकांनी उसळी घेतली.

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक २७,२९२.५५ अंकांच्या भक्कम पातळीवर उघडला आणि त्याने चढती भाजणी कायम ठेवत दिवसभरात २७.४९७.१२ अंकांची कमाल पातळीदेखील गाठली होती; परंतु कामकाजाच्या अखेरच्या सत्रात नफारूपी विक्रीचे गालबोट लागले आणि सुरुवातीची कमाई काही प्रमाणात धुऊन निघाली. पण तरीही सेन्सेक्स २४५.२७ अंकांनी वाढून २७.३७१.८४ अंकांच्या पातळीवर बंद झाला. गुरुवारी सेन्सेक्सने ४१६.४४ अंकांच्या वाढीची नोंद केली होती. राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टी निर्देशांकदेखील दिवसअखेर ६५.९० अंकांनी वाढून ८२२५.२० अंकांच्या कमाल पातळीवर बंद झाला. रिलायन्सच्या समभागाने गुंतवणूकदारांचे लक्ष वेधले. कंपनी नवीन वर्षात दूरसंचार सेवा सुरू करणार असल्याच्या चर्चेमुळे समभागाच्या किमतीत २.२६ टक्क्यांनी वाढ हाेऊन ती ९००.१५ रुपयांवर गेली. त्यामुळे सेन्सेक्सला आणखी बळकटी मिळाली.