आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मधुमेह : स्वस्त औषधांचा मार्ग मोकळा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - बहुराष्ट्रीय कंपन्या आणि भारतीय कंपन्यांत पेटंटवरून सुरू असलेल्या कायदेशीर लढाईत आणखी एका प्रकरणात अमेरिकेच्या औषध कंपनीला कोर्टाने दणका दिला. दिल्ली उच्च न्यायालयाने अमेरिकेच्या मर्क शार्प अँड डोम (एमएसडी) या कंपनीचा पेटंटसंबंधीचा दावा फेटाळला. त्यामुळे लाखो मधुमेही रुग्णांना दिलासा मिळाला आहे.
अमेरिकेच्या एमएसडी कंपनीने ग्लेनमार्क फार्मास्युटिकल या भारतीय कंपनीच्या मधुमेहावरील जीटा आणि जीटा-मेट या औषधांची निर्मिती आणि मार्केटिंग थांबवावे यासाठी दावा दाखल केला होता. या औषधांत वापरण्यात येणारा रासायनिक घटक जेनेरिक नाही. उच्च न्यायालयाने सोमवारी कॅन्सरचे औषध ग्लीवेकबाबतचा दावा फेटाळला होता. त्या पार्श्वभूमीवर या खटल्याच्या निकालाला वेगळे महत्त्व आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मर्कच्या जनुविया या मधुमेहावरील औषधाच्या एक स्ट्रीपची किंमत 300 रुपये आहे. तर ग्लेनमार्कच्या जेनेरिक औषधाची किंमत यापेक्षा 30 टक्क्यांनी कमी आहे.
दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी सुनावलेल्या आदेशात अमेरिकी कंपनीचा दावा फेटाळला. यावर मर्क कंपनीने नाराजी व्यक्त केली. वरच्या कोर्टात अपिलासह सर्व पर्यायांचा कंपनी विचार करत असल्याचे मर्कने म्हटले आहे. कंपनीचा प्रवक्ता म्हणाला, आमच्या जनुविया आणि जनुमेट औषधाबाबत पेटंटचे उल्लंघन केल्याचा आमचा दावा कोर्टाने फेटाळला. या निर्णयावर आम्ही नाराज आहोत. ग्लेनमार्क फार्मास्युटिकल कंपनीने जनुविया आणि जनुमेट औषधांच्या बाबतीत बौद्धिक संपदा अधिकार कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप मर्क कंपनीने याचिकेत केला होता.

दावा फेटाळला
> अमेरिकेच्या एमएसडी कंपनीने ग्लेनमार्क फार्मास्युटिकल या भारतीय कंपनीच्या मधुमेहावरील जीटा आणि जीटा-मेट या औषधांची निर्मिती आणि मार्केटिंग थांबवावे यासाठी दावा दाखल केला होता.
किमतीत मोठी तफावत
> मर्कच्या जनुविया या मधुमेहावरील औषधाच्या एका स्ट्रीपची किंमत 300 रुपये आहे.
> ग्लेनमार्कच्या जेनेरिक औषधाची किंमत यापेक्षा 30 टक्क्यांनी कमी आहे.