आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑलिंम्पिकचा नव्हे, हा तर आर्थिक विकासाचा इतिहास

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोणत्या देशाला किती पदके मिळतात हा ऑलिम्पिकमध्ये कुतुहलाचा विषय असतो. तसेच ते त्या देशातील राजकीय स्थिती, आर्थिक स्थैर्य, आर्थिक परिस्थिती, मनुष्यबळ, तंत्रज्ञान आणि आर्थिक वातावरणावर अवलंबून असते, हे गोल्डमन सॅक्सच्या अभ्यासाने सिद्ध केले. याचा अर्थ भारताला चांगले खेळाडू घडवण्यासाठी संतुलित आर्थिक विकास साधावी लागेल.
आर्थिक संपन्नेतेचा आणि वृत्तीचा जवळचा संबंध आहे, हे आपण मानता का. मानत असाल तर अर्थकारणाचे महत्त्व तुम्हास पटले आहे. मात्र, अजूनही तो संबंध कोणी मानत नसेल तर त्याच्यासाठी हे कोडे त्याचे उत्तर त्याने द्यायचे आहे. मुंबई शहरातील बेस्ट बससेवा आपल्यापैकी बहुतेकांनी अनुभवली आहे. मुंबईत माणसे बेस्टमध्ये बसण्यासाठी मोठमोठ्या रांगा लावतात, याचे मुंबईबाहेरील माणसाला फार कौतुक वाटते. कारण त्याच्या शहरात बससाठी रांगेत उभी असलेली माणसे त्याला क्वचितच दिसतात. आपण निष्कर्ष काढून टाकतो, की मुंबईकर किती शिस्तबद्ध आहेत. आणि आपली शहरे म्हणजे आपल्या शहरातील माणसे किती बेशिस्त आहेत. पण बाहेरच्या शहरात बेशिस्त असलेली माणसे मुंबईत कसे अचानक शिस्तीचे ठरतात. याचा विचार आपण करत नाही. त्याचे खरे कारण तुम्हाला पटते का पाहा. इतर कोणत्याही शहरात एक बस गेली की दुसरी बस केव्हा येईल, याची खात्री नसते, मात्र मुंबईत ती येणारच आणि वेळेत येणार याची खात्री असते. म्हणून रांगेत उभे राहण्याची तयारी होते. साधनसंपत्तीची मुबलकता माणसांच्या वृत्तीवर कसे काम करते, हे या उदाहरणात आपल्याला पाहायला मिळते.
साधनसंपत्तीच्या उपलब्धतेवर माणसाची वृत्ती, यशापयश कसे अवलंबून असते, याचे एक जागतिक उदाहरण एका अभ्यासाच्या निमित्ताने समोर आले. गोल्डमन सॅक्स या जागतिक वित्तसंस्थेने गेल्या 30 ऑ लिम्पिक स्पर्धांचा अभ्यास करुन काही निष्कर्ष जगारमोर ठेवले आहेत. लंडन ऑलिम्पिकच्या निमित्ताने हा अभ्यास केला गेला. ऑलिम्पिक या जगातील सर्वोच्च क्रीडा स्पर्धांमधील खेळाडूंचे यशापयश आणि त्यांच्या देशातील आर्थिक प्रगतीचा थेट संबंध आहे, हे या अभ्यासाने सिद्ध केले. ऑलिम्पिक आणि विश्वसुंदरीसारख्या जागतिक स्पर्धा हा जागतिक अर्थकारणाचा अपरिहार्य भाग असतो, हे आपण जाणतोच, मात्र या अर्थकारणातच खेळाडू. कलाकारांचेही यशापयश अवलंबून असते, हेही आता समजून घेतले पाहिजे. ऑ लिम्पिक म्हणजे 115 वर्षांचा हा अभ्यास. कोणत्या देशाला किती पदके मिळतात, हा ऑ लिम्पिकमध्ये कुतुहलाचा विषय असतो. मात्र, पदके मिळण्याचे हे गणित जसे वैयक्तिक, सांघिक कौशल्यावर अवलंबून असते, तसेच ते त्या देशातील राजकीय स्थिती, आर्थिक स्थैर्य, आर्थिक परिस्थिती, मनुष्यबळ, तंत्रज्ञान आणि आर्थिक वातावरणावर अवलंबून असते, हे गोल्डमन सॅक्सच्या अभ्यासाने सिद्ध केले. याचा अर्थ भारताला चांगले खेळाडू घडविण्यासाठी संतुलित आर्थिक विकास साधावा लागेल.
गोल्डमन सॅक्सच्या या संशोधन अहवालाचे निष्कर्ष जाणून घेऊ 1) देशाचा पदकांचा तक्ता आणि त्या देशाचे दरडोई उत्पन्न याचा जवळचा संबंध आहे. 2) दरडोई उत्पन्नात त्या अनुषंगाने जीवनमानात पडलेल्या सकारात्मक फरक त्या देशाला पुढील ऑ लिम्पिकमध्ये दोन ते पाच पदकांची भर घालणारा असतो. (भारताला या वेळी 5 पदके मिळतील असा अंदाज होता. त्याऐवजी 6 पदके मिळाली. या काळात देशाच्या दरडोई उत्पन्नात वाढ झाली आहे.) 3) ज्या देशात ऑ लिम्पिक होते त्या देशाला मिळणा-या पदकांची संख्या त्याने पूर्वी मिळवलेल्या पदकांच्या दुपटीपर्यंत झाली आहे. 4) आर्थिक विकासात आघाडी मिळविणा-या युरोप या छोट्या खंडात तब्बल 17 म्हणजे निम्म्यापेक्षा अधिक ऑ लिम्पिक झाले आहेत. मात्र आर्थिक प्रगतीचा जगात विस्तार झाल्यानंतर ती संधी आशिया, ऑ स्ट्रेलिया आणि लॅटिन अमेरिकेला मिळाली आणि ऑ लिम्पिक ख-या अर्थाने जागतिक झाले. 5) 1896 मध्ये महिलांचा 0 टक्के सहभाग असलेला सहभाग 40 टक्क्यावर जाण्यासाठी एक शतक जावे लागले. 6) ऑ लिम्पिक स्पर्धा आपल्या देशात भरविणे हे थेट आर्थिक ताकदीवरच अवलंबून आहे. आतापर्यंत चीनचा (13 टक्के) अपवाद वगळता अमेरिकेच्या तुलनेत 32 टक्के जीडीपी असलेल्या दक्षिण कोरियाने ते घेण्याची हिंमत केली आहे. इतर सर्व देशाचा जीडीपी त्यापेक्षा अधिक होता. 7) पदक तक्त्यात एकेकाळी अविकसित देशांचे स्थान नगण्य होते. आता आर्थिकदृष्टया विकसनशील झालेल्या देशांनी 50 टक्के पदके पटकावण्यास सुरवात केली आहे. 8) 1920-30च्या दशकात अविकसित देश फक्त 10 खेळांत भाग घेत, ते प्रमाण 1930-40 मध्ये 40 टक्क्यांवर गेले, तर 2000 मध्ये ते तब्बल 60 टक्क्यांवर गेले आहे. 9) पहिल्या आणि दुस-या महायुद्धांचा परिणाम वगळता ऑ लिम्पिक घेणा-या देशांचा विकासदर वेगाने वाढला आहे. (ब्रिटनच्या तिस-या तिमाहीत एकूण राष्ट्रीय उत्पन्नात 1.2 ते 1.6 टक्के वाढ होण्याची शक्यता या संस्थेने व्यक्त केली आहे.)
आधुनिक ऑलिम्पिकचे निर्माते पॅरी दी कोऊबेर्तिन यांना 1912 मध्ये स्टॉकहोम येथे झालेल्या स्पर्धांमध्ये साहित्यासाठीचे सुवर्णपदक देण्यात आले होते. (तेव्हा कलेच्याही स्पर्धा होत्या) त्यांची एक प्रसिद्ध कविता आहे. खेळा, तूच प्रगती आहे. तुझी सेवा करण्यासाठी माणसाने स्वत:चा शारीरिक आणि अध्यात्मिक विकास साधायला हवा, अशा अर्थाची ही कविता आहे. जगात आज पैशाचे महत्त्व एवढे वाढले आहे की, आज 100 वर्षांनी त्यांच्या कवितेत माणसाने आर्थिक विकासही साधायला हवा, अशी भर घालावी लागेल.