आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Capital Market News In Marathi, Investment, Indian Market, RBI

भांडवल बाजाराचा मूड चांगला, गुंतवणूकदारांना नफ्याची आशा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ - भारतीय बाजारासाठी मागचा आठवडा ऑक्टोबरनंतरच्या तीन महिन्यांतील सर्वाधिक चांगला आठवडा ठरला. व्यापारी आणि गुंतवणूकदारांत सर्वत्र उत्साह दिसून आला. विदेशी बाजारातून मिळालेले सकारात्मक संकेत,भारतीय रिझर्व्ह बँकेकडून (आरबीआय) रुपयाच्या मूल्यवर्धनासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांचा चांगला परिणाम आणि विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची सातत्याने सुरू असलेली खरेदी यामुळे बाजारात सकारात्मक कल दिसून आला. चांदी वगळता सर्व श्रेणींमध्ये (असेट) चांगली वाढ दिसून आली. औद्योगिक क्षेत्राकडून मागणी घटल्याने चांदीत 2.32 टक्के घसरण दिसून आली.


मागच्या आठवड्यात कोणी किती परतावा दिला
शेअर बाजार । मागील आठवड्यात मुंबई शेअर बाजाराचा (बीएसई) मुख्य निर्देशांक सेन्सेक्स 2.03 टक्के वाढला, तर नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (एनएसई) चा निफ्टी निर्देशांक 1.97 टक्के वाढला. भांडवली वस्तू क्षेत्रात 5.31 टक्के, आरोग्य 4.54 टक्के आणि आयटी क्षेत्रात 2.34 टक्के वाढ दिसून आली. शुक्रवारी जाहीर झालेल्या विकास दराचा परिणाम सोमवारी शेअर बाजारावर दिसून आला.


सोने : जागतिक बाजारात आलेल्या तेजीमुळे सोन्याची चकाकी वाढली. जागतिक बाजारात मागणी वाढल्याने वायदा बाजारात सोने पुन्हा एकदा 30 हजारांची पातळी गाठण्यात यशस्वी ठरले. देशातील बाजारातही मागणी वाढल्याने आणि गुंतवणूकदारांचा कल पुन्हा सोन्याकडे वळल्याचा चांगला फायदा या पिवळ्या धातूला झाला. मागील महिन्यात गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूकदारांना एकूण 7.01 टक्के परतावा मिळाला. साप्ताहिक आधारावर हा नफा 0.67 टक्के राहिला. औद्योगिक मागणी कमी झाल्याने आणि मोठ्या प्रमाणात विक्री झाल्याचा फटका चांदीला बसला. चांदीने वजा 2.32 टक्के परतावा दिला.


कच्चे तेल : गेल्या अनेक दिवसांपासून कच्च्े तेल 100 डॉलर प्रति बॅरलच्या वरच्या पातळीत आहे. ही भाववाढ पाहून देशात डिझेल आणि पेट्रोलच्या किमती वाढवण्यात आल्या आहेत. त्यामुळे या आठवड्यात गुंतवणूकदारांना यात 0.18 टक्के वाढ पाहावयास मिळाली. आगामी काळात तेजी राहण्याचे संकेत आहेत.
रुपया : रुपयात मजबुती दिसून आली. भारतीय रिझर्व्ह बँकेकडून टाकण्यात आलेली पावले, महसुली तूट कमी झाल्याने आणि मंत्रिमंडळाच्या चांगल्या निर्णयाने रुपयावर सकारात्मक परिणाम झाला. मागील आठवड्यात डॉलरच्या तुलनेत रुपया 0.15 टक्क्यांनी वधारला.


कृषी वस्तू : गारपीट, पावसाने बिघडले गणित
हरभ-यात सरत्या आठवड्यात मोठी तेजी दिसून आली. देशातील बहुतेक भागात हरभ-याचे पीक धोक्यात आले आहे. त्यामुळे उत्पादन घटण्याची चिन्हे आहेत. मागील आठवड्यात हरभ-यात 6.14 टक्के नफा दिसून आला. सोयाबीनही तेजीच्या घोड्यावर स्वार आहे. त्यात आठवडाभरात 5.54 टक्के तेजी आली. मात्र, गारपीट आणि अवकाळी पावसाने रब्बीचे गणित काहीसे बिघडले आहे. सर्व माहिती : आदित्य जैन मनया, कल्पतरू