आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारच्या बाहेर एअरबॅग; अल्कोहोल सेन्सरने दुर्घटना टळणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क- रस्त्यावरील अपघात हा केवळ देशातीलच नव्हे तर परदेशातील देखील मोठा मुद्दा आहे. दरवर्षी रस्ते अपघातात सुमारे १३ लाख एवढे मृत्यू होतात, असे एका अहवालातून स्पष्ट झाले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेनुसार २०२० पर्यंत हा आकडा २० लाखांवर पोहोचेल. दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर कारची संख्यादेखील वाढू लागली आहे. त्यामुळेच कंपन्या नवीन हायटेक सेफ्टी फीचर्सवर काम करू लागल्या आहेत. त्यात कारच्या बाहेर (एक्स्टर्नल )लावल्या जाणाऱ्या बॅग्जपासून अल्कोहोल सेन्सर आणि कारच्या ब्लॅक बॉक्सचाही समावेश आहे. आपल्या सुरक्षेसाठी कशा प्रकारच्या उपकरणांचा शोध लावला जात आहे. ही उपकरणे पाच वर्षांत प्रत्यक्षात येऊ शकतील. त्याविषयी जाणून घेऊया.....

सुरक्षित प्रवास : एक्स्टर्नल एअरबॅग्जने ३५ टक्क्यांहून अधिक बचत; ३ ते ५ वर्षांत येणार सेफ्टी फीचर्स
एक्स्टर्नल एअरबॅग्ज
>कारला बाजूने टक्कर झाल्याने सर्वाधिक नुकसान होते.
>दरवाजाच्या खालच्या भागात एअरबॅग्ज लावल्या जातील.
>छोटे कॅमेरे आणि सेन्सर संभाव्य दुर्घटनेचा अंदाज बांधेल.
>टक्कर होण्याच्या ३० मिलिसेकंद अगोदर एअर बॅग्ज उघडल्या जातील.

अल्कोहोल आणि आय सेन्सर
>स्टिअरिंग / गिअरिंग लीव्हरशी जोडलेले सेन्सर. हातावरील घामातून अल्कोहोलची पातळी लक्षात येईल.
>बेदरकारपणे कार चालवण्याचा प्रयत्न केल्यास अलार्म वाजेल, वेग आपोआप कमी होईल.
>डुलकी लागताच अलार्म वाजेल.
>ड्रायव्हिंग सीटच्या समोर आय सेन्सर लावले जातील, डोळ्यांच्या हालचालींवर निगराणी असेल.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, लेझर हेडलाइट्‍स...