आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Car Companies Offering Attractive Deals To Beat Year long Slump

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वाहन शुल्क कपातीच्या मुदतवाढीने विक्री सुसाट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - वाहनांवरील उत्पादन शुल्क कपातीला केंद्र सरकारने 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिल्याने वाहन क्षेत्राला दिलासा मिळाला. परिणामी जूनमध्ये दिग्गज कंपन्यांच्या वाहन विक्रीत वाढ झाली.

अनेक महिन्यांपासून घसरणीच्या घाटातून वाटचाल करणार्‍या वाहन विक्रीच्या गाडीला शुल्क कपातीच्या मुदतवाढीने चांगले इंधन पुरवल्याने विक्रीत वाढ झाल्याचे चित्र आहे. जनरल मोटर्स आणि टाटा मोटर्स या कंपन्यांना मात्र विक्रीतील घसरणीचा फटका बसला.मारुती-सुझुकीच्या देशातील कार विक्रीत जूनमध्ये 31 टक्के वाढ झाली .

विक्रीत घट : जनरल मोटर्स इंडिया कंपनीच्या जूनमधील विक्रीत 21.33 टक्के घसरण झाली आहे. कंपनीचे उपाध्यक्ष पी. बालेन्द्र यांनी सांगितले, उत्पादन शुल्क कपातीला मुदतवाढ मिळूनही ग्राहकांच्या नकारात्मक मानसिकतेचा फटका विक्रीला बसला.

- टाटा मोटर्सच्या विक्रीतही 29 टक्के घसरण झाली आहे. टाटाच्या प्रवासी वाहनांच्या विक्रीत जूनमध्ये 33 टक्के घट झाली आहे.

- दुचाकी विक्रीत वाढ : यामाहा कंपनीच्या मोटारसायकल विक्रीत 14.35 टक्के वाढ झाली आहे. होंडा मोटासायकल अँड स्कूटर्स इंडियाच्या विक्रीत 28.29 टक्के वाढ झाली आहे.

(फोटो - संग्रहित छायाचित्र)