आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार निर्यातीसाठी ही चांगली वेळ नाही?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काही महिन्यांपासून रुपयात मोठी घसरण झाली आहे. कार उद्योगावर याचा विपरीत परिणाम दिसून आलेला आहे. इम्पोर्टेड कार आणि त्यांच्या सुट्या भागांवरील नफ्याचे प्रमाण घटले आहे. वाहन विक्रीतील घसरत्या काळात रुपयाच्या अवमूल्यनाने कारनिर्मात्यांना वाहनांचे दर वाढवण्यास बाध्य केले आहे. मात्र ही वेळ कार निर्यात करण्यासाठी योग्य नाही काय? बहुतांश भारतीय कार निर्मात्यांना त्यांचे मॉडेल परदेशात निर्यात व्हावे, अशी इच्छा असते. मात्र यात एक मोठी अडचण आहे.

भारतातील बहुतांश कारची निर्मिती ही मध्यमवर्गाला केंद्रस्थानी धरून केली जाते. कमी किमतीच्या आधीच्याच मॉडेल्समध्ये काही सुधारणा आणि नवे रंगरुपडे देऊन ती नव्याने लाँच करण्यात येतात. यामुळे एखादा बहुराष्ट्रीय कार निर्माता जुनेच मॉडेल पुन्हा लाँच का करेल? किमान भारतीय वाहन उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांचे असेच मत आहे.

निश्चितच असे पाऊल उचलून कार निर्माता कंपन्या आपल्या विक्रीत वाढ करू शकतीलही. मात्र सत्य असे आहे की, त्या असे करू शकतात. हा उपाय अवलंबण्याचे अनेक फायदेही आहेत. जसे की, भारतीय ग्राहकांना ज्या प्रकारच्या कार हव्यात आहेत तशाच कारचे उत्पादन कंपन्या करू शकतील. या कार ग्राहकांच्या पैशांचा पुरेपूर मोबदला मिळवून देतात. भारतीय बाजारात दिखाऊपणापेक्षा गरजेला अधिक महत्त्व दिले जाते. आकार आणि किमत ही द्विसूत्री कार कंपनीला राजपद मिळवून देणारी ठरते. यामुळे भारतात सुधारणा आणि रिस्टाइल केलेल्या कार मैदान मारून नेतात.

बहुतांश भारतीय ग्राहक ‘फन टू ड्राइव्ह’ प्रकारच्या कारना अधिक पसंती देत नाहीत. भारतीयांचा ओढा वाजवी किमतीत अधिक सुविधा आणि मायलेज देणार्‍या कारकडे अधिक आहे. यामुळे भारतात कार निर्मितीची योजना आखणार्‍या कंपन्या जुन्याच कारचे नवीन मॉडेल्स बाजारात आणण्यास अधिक महत्त्व देतात. भारतीय कार निर्मात्यांची उपकरणे आणि तंत्रज्ञान एक पिढी जुने असतात. मात्र नव्या कारच्या निर्मितीतही त्याचाच वापर केला जातो. यामुळे कार निर्मितीसाठी कमी खर्च येतो. यात इंटिरिअर्समध्ये बदल, इतर काही वैशिष्ट्यांचा अंतर्भाव व काही पर्याय देऊन जुन्याच मॉडेल्सचे नवे व्हर्जन सादर केले जाते. यामुळे कार कंपन्यांच्या खर्चात बचत होते आणि अशा कारना लोकप्रियताही मोठी मिळते.

दुसरीकडे, यापैकी कारची नवीन मॉडेल्स त्यांच्यापेक्षा नव्या आणि लेटेस्ट मॉडेल्ससारखी सक्षम नाहीत. बर्‍याच कारचे इंटिरिअर आऊटडेटेड आहेत. इतकेच नव्हे तर अनेक वाहनांत सुरक्षा मापदंडांची कमतरता आहे. यामुळे कोणतीही कंपनी डील ब्रेकर म्हणून सिद्ध झालेली नाही.

- लेखक यूकेस्थित वाहन क्षेत्रातील मुक्त पत्रकार आहेत.
kabeer.mahajan@dainikbhaskargroup.com