आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नव्या वर्षात कार महागणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - उत्पादन खर्चाचा वाढता भार हलका करण्यासाठी ह्युंदाई माेटर इंडियाने आपल्या सर्व माेटारींच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी आपल्या माेटारींच्या किमती ५,००० ते २५,००० रुपयांच्या श्रेणीत वाढवणार असून त्याची अंमलबजावणी नवीन वर्षापासून करण्यात येणार आहे.

माेटार निर्मिती क्षेत्रात दुस-या क्रमांकावर असलेल्या ह्युंदाईच्या भारतीय बाजारपेठेत १० माेटारी आहेत.
वाहन बाजारातील सध्याचे प्रतिकूल वातावरण लक्षात घेता आयातीचा वाढता खर्च, उत्पादन खर्च आणि रुपयाच्या अवमूल्यनामुळे िकमती वाढवणे गरजेचे झाले असल्याचे ह्युंदाई माेटर इंिडया िल.च्या िवक्री आणि विपणन िवभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष राकेश श्रीवास्तव यांनी सांिगतले. कंपनी सध्या सर्व खर्चाचा भार सहन करीत आहे, परंतु आता मात्र िकंमतवाढ करण्यावाचून पर्याय नसल्याचे ते म्हणाले.

इतर कंपन्यांचीही किंमतवाढ
बीएमडब्ल्यू या माेटार कंपनीने गेल्याच आठवड्यात आपल्या जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून माेटारींच्या किमतीत पाच टक्क्यांची वाढ करण्याचा िनर्णय जाहीर केला हाेता. जनरल माेटर्स इंिडयानेदेखील उत्पादन खर्चाचा भार हलका करण्यासाठी माेटारींच्या िकमती जानेवारीपासून २० हजार रुपयांनी वाढवण्याचा िवचार केला आहे.

िवविध श्रेणी : मारुतीच्या भारतात विविध श्रेणीतील कार उपलब्ध आहेत. कंपनीच्या अल्टो ८०० ते ग्रँड व्हिटारा कार बाजारात आहेत. त्यांची किंमत २.३७ लाखांपासून ते २४.६ लाख रुपयांपर्यंत आहे.

कंपनीनिहाय किंमतवाढ
कंपनी संभाव्य किंमतवाढ
ह्युंदाई ५ ते २५ हजार
मारुती २ ते ४ टक्के
बीएमडब्ल्यू ५ टक्क्यांपर्यंत
जनरल मोटर्स २० हजारांपर्यंत
टाटा मोटर्स १ ते २ टक्के
महिंद्रा अँड महिंद्रा १ ते २ टक्के
कंपनी
संभाव्य किंमतवाढ
ह्युंदाई ५ ते २५ हजार
मारुती २ ते ४ टक्के
बीएमडब्ल्यू ५ टक्क्यांपर्यंत
जनरल मोटर्स २० हजारांपर्यंत
टाटा मोटर्स १ ते २ टक्के
महिंद्रा अँड महिंद्रा १ ते २ टक्के
मारुतीची किंमतवाढ
{ देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती-सुझुकीनेही आपल्या सर्व कारच्या िकमती जानेवारीपासून वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या वर्षात मारुतीच्या कार मॉडेलनिहाय २ ते ४ टक्क्यांनी महागणार आहेत. कार निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल महागल्याने सर्व मॉडेलच्या किमतीवाढीचा निर्णय कंपनीने घेतला आहे.
- मारुती-सुझुकीचे कार्यकारी संचालक (विपणन व विक्री) आर. एस. काल्सी यांनी या संदर्भात सांगितले, कंपनीने ऑक्टोबर २०१३ मध्ये कारच्या किमती वाढवल्या होत्या. तेव्हा पासून आतापर्यंत कार निर्मितीसाठी लागणा-या कच्च्या मालाच्या किमतीत मोठी वाढ झाली. त्यामुळे उत्पादन खर्च वाढला. तो कंपनीने
बराच काळ सहन केला,मात्र आता जानेवारीपासून सर्व मॉडेलच्या किंमती २ ते ४ टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला.