आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कार महागाईचा भार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - आधीच मरगळलेल्या वाहन उद्योगाला आयात शुल्कातील वाढ आणि रुपयाचे अवमूल्यन डोकेदुखीचे ठरू लागले आहे. उत्पादन खर्चाचा भार कमी करण्यासाठी जनरल मोटर्स, ऑडीने केलेल्या दरवाढीपाठोपाठ आता मर्सिडीझ बेंझ इंडियानेदेखील आपल्या सर्व मोटारींच्या किमतीत एक सप्टेंबरपासून जवळपास 4.5 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.


देशभरात विकल्या जाणा-या सरसकट सर्व मोटारींच्या किमतीत 2.5 टक्के ते 4.5 टक्क्यांच्या दरम्यान दरवाढ करण्यात येणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
उत्पादन खर्चातील वाढ आणि त्याच्याच जोडीला सर्वाधिक आयात शुल्काचा गेल्या काही काळापासून कंपनीच्या नफ्यावर ताण पडत आहे. रुपयाच्या मूल्यात निरंतर सुरू असलेली घसरण आणि वाहन उद्योगातील वाढलेले कर याचाही कंपनीच्या व्यवसायावर नकारात्मक परिणाम झाल्याचे मत कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एबरहार्ड केर्न यांनी व्यक्त केले.


आतापर्यंत कंपनी हा भार सहन करीत होती; परंतु दीर्घकाळात व्यवसायातील नफाक्षमता कायम ठेवण्यासाठी किंमतवाढ करणे अटळ असल्याचेही ते म्हणाले. रुपयाची घसरण अशीच चालू राहिली तर पुन्हा किमती वाढवणार का, असे विचारले असता केर्न म्हणाले की, त्याबाबत पुन्हा एकदा विचार करावा लागेल; परंतु चलन विनिमय दरात एका ठरावीक पातळीवर स्थैर्य येईल, असा अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. जनरल मोटर्सने दोन दिवसांपूर्वीच आपल सर्व मोटारींच्या किमतीत 10 हजार रुपयांपर्यंत वाढ केली आहे. या नवीन दराची अंमलबजावणी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात करण्यात येणार आहे. बीएमडब्ल्यू समूहानेदेखील आपल्या मिनी मोटारीसह अन्य सर्व मोटारींच्या किमतीत 5 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
रुपयाचे अवमूल्यन आणि उत्पादन खर्चातील वाढ लक्षात घेऊन गेल्याच महिन्यात ऑडीनेदेखील आपल्या सर्व मोटारींच्या किमतीत 4 टक्क्यांनी वाढ केली आहे. कंपनीने आपल्या आर 8 या मोटारीच्या किमतीत कमाल 4.42 लाख रुपयांनी वाढ केली आहे.
मर्सिडीझची किंमतवाढ
मॉडेलचा प्रकार नवीन किंमत वाढ
ए क्लास 180 सीडीआय 22.05 लाख रु. 4 %
बी क्लास 180 सीडीआय 23.50 लाख रु. 4 %
सी क्लास 200 सीजीआय 32.25 लाख रु. 2.5 %
इ-क्लास 200 सीजीआय 42.16 लाख रु. 3.5 %
एमएल क्लास 250 सीडीआय 50.98 लाख रु. 4%