आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार रेसिंगवर आधारित चित्रपटांची हॉलीवूडमध्ये धूम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या मोटार रेसिंगवरील चित्रपटाची चर्चा सर्वत्र रंगते आहे. या चित्रपटाचे नाव आहे रश. दोन रेसिंग चालकांतील चुरशीच्या स्पर्धेची ही कथा आहे. चित्रपटात कार रेसचे अत्यंत चित्तथरारक चित्रण आहे. संगणकाच्या साहाय्याने चित्रित केलेल्या दृश्यांमुळे दिग्दर्शक आणि कलावंतांचे काम सोपे झाले आहे. उत्तम चित्रीकरण आणि नियंत्रित टकरीचे आधुनिक तंत्राने बनवलेली फास्ट अँड फ्युरियससारखी दृश्ये चित्रपट पाहण्याचा आनंद द्विगुणित करतात. मात्र हे सर्व बनावट आहे. पूर्वीच्या काळात चित्रपट कलावंतांना अ‍ॅक्शन आणि कार रेसच्या दृश्यांत 100 टक्के स्वत:च काम करावे लागायचे. या वेळी हॉलीवूडमध्ये कार रेसवर आधारित काही उत्तम चित्रपटांविषयी...

चित्रपट : रोनिंग अभिनेता : रॉबर्ट जी नीरो
या एपिक क्राइम थ्रिलर चित्रपटात एक नव्हे तर कार रेसची तीन मोठी दृश्ये आहेत. यात बीएमडब्ल्यू एम-5, ऑडी एस 8 आणि मर्सिडीज 6.9 या कार युरोपभर एकमेकांचा पाठलाग करतात. या कारचा पाठलाग अशा लोकेशनवर चित्रित केला आहे की प्रेक्षक रोमांचित होतात. दिग्दर्शक जॉन फ्रँकनहॅमरने सांगितले होते की, सर्वच दिग्दर्शकांना आदर्श वाटावा असा कार रेसवरील चित्रपट बनवण्याची इच्छा आहे. कार रेसिंगवर मनोरंजक व रोमांचक चित्रपट कसा बनवावा हे नव्या प्रतिभावंताला कळावे असे मला वाटते. फ्रँकनहॅमरने आपले म्हणणे निर्विवादपणे खरे केले.

फिल्म : बुलेट -अभिनेता : स्टीव्ह मॅक्विन
अमेरिकेत मसल कारची क्रेझ मोठ्या प्रमाणात आली होती तेव्हा हा चित्रपट पडद्यावर झळकला होता. पीटर येट्स यांच्या कसबी दिग्दर्शनात बनलेल्या या चित्रपटांत अनेक रोमांचक आणि रहस्यमय दृश्ये होती. चित्रपटांत 400 हॉर्सपॉवरची मस्टँग कार आणि सॅन फ्रान्सिस्कोच्या रस्त्यावरून अशा पळतात की विश्वासच बसत नाही. या दहा मिनिटांच्या दृश्याच्या चित्रीकरणासाठी तीन आठवडे लागले होते. जेव्हा एकमेकांच्या मागेपुढे सुसाट पळणार्‍या कार उजवीकडे आणि डावीकडे वळतात तेव्हाचा आनंद अवर्णनीय आहे. कारच्या रेसचे दृश्य चित्रित करताना येट्स यांनी कारचा कमाल वेग प्रतितास 75 ते 80 किलोमीटर वेगाने ठेवण्यास सांगितले होते. मात्र प्रत्यक्ष चित्रीकरणाच्या वेळी कारचा वेग प्रतितास 110 किलोमीटर पेक्षा जास्त झाला होता. यात कॅमेरे लावलेल्या कारचाही समावेश होता. हा वेग ती दृश्ये पाहतानाही जाणवतो. त्यामुळे स्टिम्युलेटरवर कार चालवत आहोत असे प्रेक्षकांना भासते.

चित्रपट : व्हॅनिशिंग पॉइंट - अभिनेता : बॅरी न्यूमॅन
अभिनेता बॅरी न्यूमॅन हे त्या काळचे सर्वात धडाकेबाज आणि थंड डोक्याने काम करणारा बहुधा एकमेव कलावंत मानण्यात यायचे. चित्रपटात एक जण कायद्याच्या कचाट्यातून पलायन करतो आणि वाळवंटात एक क्लासिक मसल कार दामटवतो. एकूणच व्हॅनिशिंग पॉइंट एक अविस्मरणीय चित्रपट आहे. उत्तम साउंड ट्रॅक, देखणे चित्रीकरण आणि दिग्दर्शन आणि ऑटोमोटिव्हच्या चित्तथरारक कसरती यांचे उत्कृष्ट चित्रण यात आहे.

हे सर्व चित्रपट ऑनलाइन उपलब्ध आहेत. हे सर्व चित्रपट आवर्जून पाहण्यासारखे आहेत. पाहिले नसतील तर वेळ काढून ते पाहा. वेळ वाया जाणार नाही.

लेखक ब्रिटनस्थित ऑटोमोटिव्ह क्षेत्रातील पत्रकार आहेत.