आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मेमध्ये कार विक्रीचा मध्यम गिअर, मारुती-फोर्ड-टीव्हीएसला झटका

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - अर्थसंकल्पात अनेक करांत वाढ झाल्यानंतरही महाग झालेल्या कार तसेच इतर वाहनांना ग्राहकांनी बर्‍यापैकी प्रतिसाद दिल्याचे चित्र आहे. टाटा मोटर्स, ह्युंदाई मोटार, महिंद्रा अँड महिंद्रा, टोयोटासारख्या ऑटो क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांनी मेमध्ये चांगली विक्री नोंदवली आहे. तर मारुती-सुझुकी, जनरल मोटर्स, फोर्ड आणि टीव्हीएस मोटर्स या कंपन्यांना मात्र विक्रीतील घसरणीचा झटका बसला आहे. 2011 हे वर्ष विक्रीच्या पातळीवर अत्यंत खडतर गेल्यानंतर नव्या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत वाहन विक्रीची गाडी चांगली धावली आहे. हीरो मोटोकॉर्पने तर मेमध्ये मासिक विक्रीचा विक्रम नोंदवला आहे.

फोर्ड इंडियाच्या विक्रीला ब्रेक
फोर्ड इंडियाच्या एकूण विक्रीमध्ये 14.66 टक्क्यांनी घसरण होऊन ती आधीच्या 9,057 मोटारींवरून 7,729 मोटारींवर आली आहे.

ह्युंदाईची चांगली विक्री
ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेडच्या विक्रीमध्ये 16.56 टक्क्यांची वाढ होऊन ती 47,762 वाहनांवरून 55,670 वाहनांवर गेली आहे. कंपनीच्या स्थानिक बाजारातील विक्रीत 2.85 टक्क्यांनी वाढ होऊन ती 31,123 वाहनांवरून 32,010 वाहनांवर गेली आहे. कंपनीच्या निर्यातीत 42.20 टक्क्यांनी वाढ होऊन ती 16,639 वाहनांवरून 23,660 वाहनांवर गेली आहे. कंपनीने इऑन, सॅँट्रो, आय 10, आय 20 वाहनांची 48,250 विक्री झाली आहे.

मारुती-सुझुकीच्या विक्रीत घट
एकूण मोटार विक्रीत 4.99 टक्क्यांनी घट होऊन ती गेल्या वर्षातल्या 1,04,073 मोटारींवरून यंदाच्या मे महिन्यात 98,884 मोटारींवर गेली आहे. स्थानिक मोटार विक्री 4.32 टक्क्यांनी घसरून ती याच कालावधीत अगोदरच्या 93,519 मोटारींवरून 89,478 मोटारींवर आली. निर्यातीमध्ये 10.88 टक्क्यांनी घट होऊन ती अगोदरच्या 10,554 मोटारींवरून 9,406 मोटारींवर आली. प्रवासी मोटारींची विक्री 5.94 टक्क्यांनी घसरून ती 76,874 मोटारींवरून 72,309 मोटारींवर आली आहे.
टोयोटा किलरेस्कर : विक्रीत दुप्पट वाढ
टोयोटा किलरेस्करच्या विक्रीत दुपटीने वाढ होऊन ती 7,470 वाहनांवरून 15,501 वाहनांवर गेली आहे. कंपनी आता निर्यातीवर लक्ष देणार आहे.
महिंद्रा अँड महिंद्रा विक्रीत 28 % वाढ
कंपनीच्या विक्रीमध्ये मे महिन्यात 28 टक्क्यांची वाढ होऊन ती अगोदरच्या वर्षातल्या याच कालावधीतील 34,323 मोटारींवरून 43,988 मोटारींवर गेली. कंपनीच्या प्रवासी मोटारींची (युटिलिटी व्हेईकल आणि व्हेरिटोसह) विक्री 27 टक्क्यांनी वाढून ती 16,702 मोटारींवरून 21,154 मोटारींवर गेली आहे.

जनरल मोटर्सच्या विक्रीत घट
कंपनीच्या विक्रीत 27.01 टक्क्यांनी घट होऊन ती 8329 मोटारींवरून 6079 मोटारींवर आली आहे.

हीरो मोटोकॉर्पचा टॉप गिअर
हीरो मोटोकॉर्पच्या दुचाकी विक्रीमध्ये 11.28 टक्क्यांनी वाढ होऊन ती 5,00,234 वाहनांवरून 5,56,644 वाहनांवर गेली आहे.

टाटा मोटर्सच्या विक्रीत 4 टक्के वाढ
टाटा मोटर्सच्या एकूण विक्रीमध्ये चार टक्क्यांनी वाढ होऊन ती 64,347 वर गेली आहे. कंपनी व्यावसायिक आणि प्रवासी वाहनांची स्थानिक बाजारपेठेतील विक्री 6 टक्क्यांनी वाढून ती 56,571 वाहनांवरून 60,128 वाहनांवर गेली आहे. व्यावसायिक वाहनांची विक्री मे महिन्यात 7 टक्क्यांनी वाढून ती 37,170 वाहनांवरून 39,625 वाहनांवर गेली आहे. हलक्या व्यावसायिक वाहनांची विक्री 26 टक्क्यांनी वाढून ती 21,638 वाहनांवरून 27,174 वाहनांवर गेली आहे. मध्यम आणि अवजड वाहनांची विक्री 20 टक्क्यांनी घसरून ती 15,532 वाहनांवरून 12,451 वाहनांवर आली आहे. प्रवासी वाहनांची विक्री मे महिन्यात 6 टक्क्यांनी वाढून ती 19,401 वरून 20,503 वाहनांवर गेली आहे.

ऑडी इंडियाच्या विक्रीत 37 टक्के वाढ
ऑडी इंडियाच्या विक्रीमध्ये 10 टक्क्यांनी वाढ होऊन ती 450 मोटारींवर गेली आहे. अगोदरच्या वर्षात याच कालावधीत कंपनीने 480 मोटारींची विक्री केली होती. जानेवारी ते मे या कालावधीत कंपनीच्या विक्रीमध्ये 37 टक्क्यांनी वाढ होऊन ती अगोदरच्या 2394 मोटारींवरून 3,281 मोटारींवर गेली आहे.

निस्सान मोटर इंडियाची विक्री वाढली
निस्सान मोटर इंडियाच्या विक्रीत 98 टक्क्यांनी वाढ होऊन ती मे महिन्यात 1,588 वाहनांवरून 3,138 वाहनांवर गेली आहे.
जुन्या पेट्रोल कार होणार अधिक स्वस्त