नवी दिल्लीः मान्सून नाराज असला तरी ऑटो कंपन्यांसाठी यंदा चांगले वातावरण असल्याचे दिसत आहे. जून महिना कार विक्रीमध्ये चांगला होता. तर दुसरीकडे सरकारने उत्पादन शुल्कात केलेल्या कपातीमुळे येणार्या सणासुदीच्या काळात कार बाजाराला अजून वेग देण्याचे काम केले आहे.
ऑटो विक्रीमधील वाढता वेग आणि सरकारी सुट मिळाल्यानंतर ऑटो कंपन्यांनी आता सणाच्या दृष्टीकोणातून तयारी सुरू केली आहे. भारतातील महत्त्वाच्या कार कंपन्यांनी सुधरत्या आर्थिक व्यवस्थेचा फायदा घेण्यासाठी अनेक नवीन कार मॉडेल तसेच नवनव्या योजना देऊन ग्राहकांना आकर्षित करण्यास सुरूवात केली आहे.
मारूती सुझूकीने येत्या महिन्यात नवे 5 ते 6 नवीन कार मॉडेल लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. त्याच बरोबर इतर कार कंपन्यांनीही आकर्षक योजना आखण्यास सुरूवात केली आहे.
बाजारात आनंदाचे वातावरण
बर्याच कालावधीनंतर कार विक्रीमध्ये झालेल्या वाढीमुळे भारतीय शेअर मार्केटमध्ये आता ऑटो सेक्टर हिरव्या कंदीलावर आहे. ऑटो कंपन्यांनी उत्पादन शुल्कात जर सुट मिळाली तर विक्री वाढण्याचे संकेत दिले होते. जे आता प्रत्यक्षात दिसत आहे. येणार्या काही महिन्यांमध्ये सण उत्सवाच्या काळात ऑटो कंपन्यांना विक्री वाढण्याची अपेक्षा आहे. त्यामुळेच शेअर बाजारामध्येही सकारात्मक वातावरण आहे. बुधवारी शेअर मार्केटमध्ये ऑटो सेक्टर 0.7 टक्क्यांनी वाढल्याचे दिसून आले.
(जूनमध्ये कार आणि दुचाकींच्या विक्रीचा आकडा)
कंपनी | जूनमध्ये युनीट सेल | टक्के |
होंडा कार | 16316 | 75 |
मारुती सुझुकी | 100964 | 31 |
ह्यूंदय | 33514 | 9.5 |
टोयोटा | 12010 | 9 |
फोर्ड | 7258 | 1.5 |
महिंद्रा | 16780 | -3 |
जनरल मोटर्स | 5172 | -21 |
टाटा मोटर्स | 7911 | -31 |
बजाज ऑटो | 305465 | 3 |
होंडा मोटरसायकल | 323224 | 28 |
यामाहा | 40666 | 14.4 |
महिंद्रा 2व्हीलर | 14389 | 83 |
दुचाकी वाहनांना होणार अडचण
खराब मान्सूनचा दुचाकी वाहनांच्या विक्रीवर परिणाम पडण्याची शक्यता आहे. जूनमध्ये बजाज ऑटोमध्ये विक्रीच्यामानाने साधारण 3 टक्के एवढी वाढ झाली आहे. या दरम्यान कंपनीने एकूण 305,465 वाहनांची विक्री केली आहे. ग्रामीण भागाचा विचार करता खराब मान्सूनमुळे दुचाकी वाहनांच्या विक्रीत घट पाहायला मिळू शकते. यामुळे संपूर्ण दुचाकी वाहन क्षेत्रावर परिणाम पडू शकतो.
पुढील स्लाईडवर पाहा... कोणाकोणाची विक्री वाढली