आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार विक्रीला गती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अबकारी शुल्काने दिलेला दिलासा आणि त्यातच इंधनांच्या कमी झालेल्या किमती यामुळे मोटार उद्योगाने पुन्हा वेग घेतला आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून विक्रीतील मरगळ झटकल्या जाऊन मोटारींच्या विक्रीत नोव्हेंबरमध्ये ९.५ टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

मागील वर्षातल्या याच महिन्यातील १,४२,८४९ मोटारींच्या तुलनेत यंदा ही विक्री १,५६,४४५ मोटारींवर गेली आहे. सर्व गटांतील वाहनांच्या विक्रीत ५.०३ टक्क्यांनी वाढ होऊन ती १५,२६,५१४ वाहनांवरून १६,०३,२९२ वाहनांवर गेली असल्याचे सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्सने (सियाम) म्हटले आहे. यंदाच्या वर्षात मोटारींच्या विक्रीमध्ये बराच चढ-उतार दिसून आला; परंतु वाहन उद्योगाला ख-या अर्थाने चालना द्यायची असेल, तर व्याजदर कपात आवश्यक असून अबकारी शुल्कचा दिलासा ३१ डिसेंबरनंतरही मिळणे गरजेचे आहे. सरकार अर्थसंकल्पापर्यंत म्हणजे फेब्रुवारीपर्यंत तरी अबकारी शुल्क सवलतीला मुदत वाढ देईल, अशी आशा असल्याचे सियामचे महासंचालक विष्णू माथूर यांनी सांगितले.