आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Car, TV , Refrigetor Make Mobile User : Videocon Mobile CEO Arvind Bali

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कार, टीव्ही, फ्रिज बनणार मोबाइल युजर : व्हिडिओकॉन मोबाइलचे सीईओ अरविंद बाली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ - घरातील टीव्हीसह रेफ्रिजरेटर, मायक्रोवेव्ह ओव्हन आणि कारच्या वेगवेगळ्या भागांत मोबाइल सिमकार्ड लावलेले आगामी काळात दिसेल, असे मत व्हिडिओकॉन मोबाइलचे सीईओ अरविंद बाली यांनी व्यक्त केले. सिमकार्डच्या मदतीने ग्राहकांना ही उपकरणे व्यवस्थित चालतात की नाही याची माहिती मिळेल. तसेच या उपकरणाच्या निर्मिती करणा-या कंपनीलाही त्याच्या कामगिरीबाबत सातत्याने माहिती मिळेल, असेही त्यांनी सांगितले.


ते म्हणाले, आतापर्यंत या उपकरणाची माहिती घेण्यासाठी कंपन्यांना दारोदार सर्व्हे करत फिरावे लागायचे. आता फोर-जी सेवांमुळे या उपकरणाची माहिती कंपनीत बसल्या जागी मिळू शकते. बीएसएनएलनंतर आता खासगी क्षेत्रातील कंपन्याही लवकरच ही सेवा घेऊन येत आहेत. मोबाइल कंपन्या ग्राहक वाढवण्याऐवजी उपयुक्तता वाढवण्यावर भर देत आहेत. येत्या काही वर्षांत 125 कोटींच्या या देशात सिमकार्डची संख्या 500 कोटींपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.


व्हिडिओकॉन विस्तारणार
मोबाइलचे जाळे विस्तारण्यावर व्हिडिओकॉनचा भर राहणार असल्याचे बाली यांनी स्पष्ट केले. मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांत नेटवर्क वाढवण्यात येणार आहे. त्यासाठी येत्या दोन महिन्यांत 1550 नवे टॉवर उभारण्यात येणार आहेत. शहरासह ग्रामीण भागात टॉवर उभारण्यात येणार आहेत. मोबाइल कंपन्या ग्राहक वाढवण्याऐवजी उपयुक्तता वाढवण्यावर भर देत आहेत, त्याचाच हा एक भाग आहे.